गुटखा विक्री प्रकरणी अटकेतील संशयितास सशर्त जामीन

मालवण । प्रतिनिधी
मालवण तारकर्ली नाका येथील गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ साठवणुकीच्या गुन्ह्यामधील अटकेतील संशयित अमित अशोक सावंत वय ४०, राह. भरड मालवण यास मे. सत्र तथा जिल्हा न्यायाधीश ओरोस यांनी ५० हजाराच्या रकमेवर सशर्त जामीन मंजूर केला. संशयितातर्फे ॲड. स्वरुप नारायण पई, ॲड यतिश खानोलकर यांनी काम पाहिले.स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांनी मालवण तारकर्ली नाका येथे केलेल्या छाप्याकामी महालक्ष्मी जनरलस्टोरच्या बाजूच्या शेडमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा मिळून आल्याने फिर्यादी पोलिसांनी अमित अशोक सावंत वय 40 वर्षे, राह. भरड मालवण याचे विरूद्ध मालवण पोलीस ठाण्यात दि. 03/06/2026 रोजी भारतीय न्याय संहिता कलम 123 व अन्नसुरक्षा आणि मानके कायदा कलम 26(2), 27(3), 30(2) व 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामधे संशयितास अटक करुन मे. मालवण न्यायालयात हजर केले असता मे. मालवण न्यायालयाने संशयितास दि. 06/062026 रोजी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यानंतर संशयीता च्यावतीने ओरोस येथील मे. जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज करण्यात आला होता. या जामीन अर्जाचे सुनावणीअंती मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयाने संशयितास रक्कम रु. 50,000/- चा सशर्त जामीन मंजूर केला. यामध्ये संशयिताने तपासकामात ढवळाढवळ न करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे व पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत.
Source link



