Uncategorized
कुलदीप कुमारला सुवर्णपदक

वृत्तसंस्था, भुवनेश्वर
शनिवारी येथे झालेल्या पहिल्या इंडियन इन डोअर खुल्या संयुक्त अॅथलेटिक्स स्पर्धेत मध्यप्रदेशचा पोलव्हॉल्टर 21 वर्षीय कुलदीप कुमारने पुरूषांच्या पोलव्हॉल्ट प्रकारात नव्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकाविले.
या क्रीडा प्रकारात कुलदीप कुमारने 5.41 मी.ची नोंद केली. तसेच त्याने या क्रीडा प्रकारात मध्यप्रदेशच्या देव मिनाने नोंदविलेला 5.40 मी.चा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. मात्र यावेळी देव मिनाला या क्रीडा प्रकारात तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तामिळनाडूच्या जी. रिगनने 5.25 मी.ची नोंद करत रौप्य पदक तर मध्यप्रदेशच्या देव मिनाने 5.20 मी.ची नोंद करत कांस्यपदक घेतले.
Source link



