Uncategorized

उष्माघात टाळण्यासाठी सरकारकडून मार्गसूची

उन्हाच्या तप्त झळांनी बेळगावकर हैराण : उन्हाची तीव्रता सकाळी 11 नंतर अधिक तीव्र : उष्माघात जीवघेणा ठरण्याची शक्यता

बेळगाव : उन्हाच्या तप्त झळांनी बेळगावकरांना हैराण केले आहे. असा उष्मा आणि अशा झळा यापूर्वी कधी अनुभवल्या नव्हत्या, असे लोक म्हणत आहेत. सकाळी 8.30 वा. उन्हाची तीव्रता जाणवू लागते आणि साधारण 11 नंतर ती अधिक तीव्र होते. उष्माघात कधी कधी जीवघेणा ठरू शकतो म्हणून राज्य सरकारनेसुद्धा मार्गसूची जारी केली आहे.

सरकारने स्पष्ट केले आहे की,

  • तहान नसतानाही भरपूर पाणी प्या.
  • हलके फिकट रंगाचे सैल व सुती कपडे वापरा.
  • काळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर शक्यतो टाळा.
  • उन्हामध्ये अधिक परिश्रमाची कामे टाळा.
  • दुपारी 12 ते 3 या वेळेत घराबाहेर काम करू नका.
  • सकाळी 11 ते 5 या वेळेत सभा, बैठक घ्यावयाची असल्यास शामियाना किंवा मंडपाची व्यवस्था करावी. खेळती हवा असावी व त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करावी.
  • शरीर निर्जलीकरण करणारे मद्यपान, चहा, कॉफी, कार्बोनेटेड थंड पेये टाळावीत.
  • शक्यतो लिंबू पाणी, ताक व तत्सम घरात तयार केलेली पेये व ओआरएस यांचा वापर करावा.
  • पार्किंग केलेल्या वाहनापाशी लहान मुले किंवा प्राण्यांना सोडू नये.
  • पाळीव प्राण्यांना सावलीमध्येच ठेवावे व त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे.
  • घरामध्ये थंडावा निर्माण करण्यासाठी पडदे, शटर, सनशेड लावावे.
  • घराबाहेर जाताना पाण्याची बाटली, छत्री, टोपी, हेडकव्हर, हॅण्ड टॉवेल, हॅण्ड फॅन, ग्लुकोज, ओआरएस यांचा समावेश असलेला किट सोबत घ्यावा.
  • शहर-निमशहर, झोपडपट्टी भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असण्याची खात्री करून घेणे.
  • बाजारपेठ, बसस्थानक व गर्दीच्या ठिकाणी पिण्याचे पाणी व शेडची व्यवस्था करणे.
  • पशुचिकित्सालयामार्फत प्राण्यांसाठी औषधांची व्यवस्था करणे.
  • वाहनचालकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणे व प्रवाशांनाही वारंवार सावध करणे.
  • सामूहिक बैठक, सभास्थळांवर पिण्याचे पाणी, खेळती हवा, आसन व्यवस्था, प्राथमिक उपचाराची औषधे तयार ठेवणे.
  • शक्यतो सभा-समारंभ सकाळी किंवा संध्याकाळी आयोजित करण्यात यावेत.

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

  • जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आपल्या जिल्ह्याशी संबंधित योजना तयार करून त्याची चोखपणे अंमलबजावणी करणे.
  • जिल्हाधिकारी, पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने जलाशयातील पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्यासाठी प्राधान्य देणे.
  • मागील वर्षातील माहितीच्या आधारे पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही याची दक्षता घेणे.
  • टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी व खासगी कूपनलिकेची नोंद घेऊन पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी नगर विकास खात्याने पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे.
  • शहर आणि निमशहर भागांना पाईपलाईनद्वारे स्थानिक संस्थांनी पिण्याचे पाणी पुरविणे गरजेचे आहे.
  • पाणी उपलब्ध असलेल्या स्थळांवरील विजेचे पंप, हॅण्ड पंप यांची दुरुस्ती करणे, कमी पाणी असलेल्या कूपनलिकेचे क्लशिंग करणे, तिची खोली वाढविणे, ऑरो प्लांट उभारणे अशी कामे हाती घेणे आवश्यक आहे.
  • पिण्याच्या पाण्याचा दर्जा वेळोवेळी तपासण्यात यावा व पाणी दूषित झाल्यास त्याचे शुद्धीकरण करणे.

आगीच्या घटना टाळण्यासाठी

  • रुग्णालये, उद्योगधंदे, वर्दळीच्या ठिकाणी आगीसारखी दुर्घटना घडू नये, यासाठी वेळोवेळी पाहणी करण्यात यावी व सुरक्षिततेसाठी प्रशिक्षणही द्यावे.
  • सार्वजनिक स्थळांवर अग्नी सुरक्षेसंबंधी ऑडिट करणे बंधनकारक असेल.
  • रसायने व इतर द्रवपदार्थ संग्रहित करून ठेवण्यात येणाऱ्या गोदामांवर अग्नी सुरक्षिततेसंबंधी उपाययोजना हाती घेऊन जागृती करावी.

उन्हामुळे शरीरावर होणारे परिणाम-लक्षणे

उन्हामुळे जर निर्जलीकरण, पेटके येणे, ताप येणे, चक्कर येणे, कंटाळवाणे वाटणे, अशक्तपणा, डोकेदुखी, मळमळणे, उलट्या, स्नायूदुखी, घाम येणे, शरीराचे तापमान 40 अंश म्हणजेच 104 अंश फॅरेनहाईट किंवा त्याहून अधिक असणे श्वासोच्छवासाला त्रास होणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. अशा व्यक्तींना सावलीच्या ठिकाणी व थंड वातावरणात स्थलांतरित करावे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​