Uncategorized

Solapur News | लोखंडवाला कॉम्प्लेक्ससमोर साचणाऱ्या पाण्याचा नागरिकांना मनस्ताप; प्रशासनाचे ‘जैसे थे’ धोरण.

                           होटगी रोडवरील पाणी साचण्याची समस्या कायम;

सोलापूर – अनेक वर्षापासून होटगी रोडवरील लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या समोरील बाजूस सातत्याने कीआयपी रोडवर पाणी साचत आहे. गेल्या अनेक वर्षापासूनची ही समस्या कायम असून, अनेक वर्षांनंतरही महापालिका हा पाण्याचा निचरा करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.

योडासाठी पाऊस पडला तरी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचते, त्यामुळे वाहतुकीलाही अडचण निर्माण होते. याविषयीअनेकवेळा पाठपुरावा केला गेला आहे. तसेच महापालिकेच्या वतीने अनेक वेळा या साचणाऱ्या पाण्यालानिचरा होत नसल्याने साठते पाणी ट काढून देण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र त्यावर रामबाण उपाय निघू शकला नाही. पावसामुळे या ठिकाणी पाणी साचते त्याचा त्राससर्वसामान्य नागरिकांना होतो.

त्यामुळे या पाण्यावर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने होटगी रोड परिसरात नळासाठी पाणी सोडल्यावर तर रस्त्यावर पाण्याचे पाटच वाहतात. कीआयपी मार्गावर सोसायटी किंवा स्वतंत्र बंगल्यांना नळाच्या ज्या जोडण्या दिल्या आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गळती आहे. त्यामुळे पाणी आल्यावर सिध्देश्वर कॅन्सर हों स्पिटल समोरील भागात भरपूर पाणी वाहते.

ते पाणी व्हीआयपी मार्गावर येते. शिवाय औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावरील पाणीही प्रमुखमार्गावर वाहत असल्याचे दिसून येते. शहराच्या गावठाण भागात पाण्याच्या दिवशी सर्वच रस्ते भिजलेले असतात. जुने विठ्ठल मंदिरापासून वाहणारे पाणी उतारावर चौपाडच्या मार्गावर येते. शिवाय दक्षिण कसब्यात जेव्हा पाणी येते, तेव्हा फुटलेल्या नळाचे पाणी शिंदे चौकापर्यंत वाहत असल्याचे दिसून आले. महापालिकेच्या झोन कार्यालयाने पाणी येण्याच्या दिवशी परिसराचे सर्वेक्षण करून नळाची गळती थांबवावी, अशी मागणी आहे.

पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी साठते.
रस्त्यावर पाणी साचल्याने गाड्या घसरून अपघात होण्याचा संभव असतो तसेच पाण्यामधून गाड्या चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी साठते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​