Solapur accident | सोलापुरात तडीपार भावाची सख्ख्या बहिणीला कुऱ्हाडीचा धाक; १७०० रुपये लुटून परिसरात माजवली दहशत

सोलापुरात निर्दयी भावाकडून बहिणीची लूट आणि धमकी
सोलापूर – पैशासाठी बहिणीस मारहाण करून तिच्याकडील १७०० रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरणाऱ्या तडीपार भावाविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जगदेवी ऊर्फ संतोषी किसन गुंड (वय ५०, रा. संतोष नगर, बाळे, सोलापूर) या महिलेच्या फिर्यादीवरून संजय उपाडे (रा. संतोष नगर, बाळे, सोलापूर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जगदेवी व संजय हे दोघे बहीण-भाऊ आहेत. जगदेवी यांची मुले त्यांच्या माहेरी होती. त्यामुळे त्या माहेरी भाऊ संजय उपाडे यास मुलांच्या खर्चासाठी पैसे देत होत्या. कोरोनानंतर जगदेवी या सोलापुरात येऊन राहू लागल्या.
त्यानंतर संजय उपाडे हा जगदेवी यांना मी तुझ्या मुलांचा खर्च केला असून मला एक लाख रुपये दे असे म्हणून त्रास देत होता. जगदेवी यांनी एका कॉ लेजमधील कॅन्टीन चालवायला घेतल्यानंतरही संजय उपाडे याने त्या कॉलेजमध्ये येऊन जगदेवी यांना शिवीगाळ करून तेथील सिक्युरिटी गार्हच्या पोटात चाकू खुपसून त्यास मारहाण केली होती. याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात न्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर संजय उपाडे यास तडीपार करण्यात आले होते.
तडीपार असतानाही संजय उपाडे हा १३ मार्च रोजी हातात कुऱ्हाड घेऊन जगदेवी यांच्या घरी येऊन पैसे दे, नाही तर खल्लास करतो अशी मकी देत शिव्या देऊन निघून गेला होता. त्यानंतर ६ एप्रिल रोजी दुपारी संजय हा दारूच्या नशेत हातात कुडाड घेऊन येऊन जगदेवी यांचा रस्ता आडवून त्यांना शिवीगाळ करून त्यांच्याकडील पैशाचे पाकिट घेऊन पाकिटातील रोख १७०० रुपये जबरदस्तीने घेतले. तसेच आजूबाजूला जमलेल्या लोकांना कुऱ्हाड दाखवित दहशत माजवित लोकांना शिवीगाळ केली. म्हणून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार ढोबळे पुढील तपास करीत आहेत.
Source link
