Uncategorized

Snowfall in Sikkim; 1,500 tourists stranded.

उत्तर प्रदेशात वीज पडून 3 दिवसांत 15 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सिक्कीमच्या मंगन जिह्यातील लाचेन-चुंगथांग रस्त्यावर रविवारी मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी झाल्यामुळे भूस्खलन झाले. या आपत्तीमुळे रस्त्याला मोठ्या भेगा पडल्यामुळे तेथे 1,500 पर्यटक अडकले आहेत. या पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सोमवारी दिवसभर मदत व बचावकार्य सुरू होते. दरम्यान, पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर भारतात हवामानात मोठा बदल दिसून येत आहे. रविवारी उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील यमुनोत्री मंदिरासह तीन जिह्यांमध्ये हिमवृष्टी झाली. तसेच सहा जिह्यांमध्ये पाऊस आणि गारपीट झाली.

हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पितीच्या उंच भागातही हिमवृष्टी झाली. शिमला, कुल्लू आणि मंडीमध्ये झालेल्या गारपिटीमुळे सफरचंदाच्या पिकाचे नुकसान झाले. उत्तर प्रदेशात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटामुळे गेल्या 72 तासांत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी काशी, गोंडा, सुलतानपूर आणि कानपूरसह 11 जिह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. तर कानपूर, मथुरा आणि संभलमध्ये गारपीट झाली. राजस्थानमध्ये 14 जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा देण्यात आला आहे. दिल्ली-एनसीआर आणि हरियाणाच्या काही भागांमध्ये पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​