Shaktipeeth Highway | शक्तिपीठ महामार्गाचा नवा मार्ग ठरला! शिरोळ, हातकणंगले आणि कागल तालुक्यांना वगळले

शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या रेखांकनाला मंजुरी
कोल्हापूर : राज्य शासनाचामहत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या, राज्यातील तीर्थक्षेत्रे जोडणार्या शक्तिपीठ महामार्गातून जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले आणि कागल तालुका वगळला जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते तर हा महामार्ग सातारा जिल्ह्यातून जाणार असून, त्यासह सुधारित नव्या रेखांकनाला राज्य शासनाने बुधवारी मान्यता दिली.
या नव्या रेखांकनानुसार, शक्तिपीठ आता पन्हाळा आणि चंदगड तालुक्यांतूनही जाणार आहे. मात्र, गावनिहाय अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग नेमका कोणत्या गावांतून आणि कसा जाणार आहे, हे स्पष्ट णार आहे. मात्र याबाबत अधिकृत माहीती रात्री उशीरा पर्यंत समजु शकली नाही.
राज्य शासनाने नागपूर-गोवा शीघ्र संचार द्रुतगती महामार्गाच्या रेखांकनाला ७ एप्रिल २०२४ रोजी मान्यता दिली होती. मात्र, या प्रस्तावित महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यात मोठा विरोध झाला. यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील भूसंपादनाची अधिसूचना १५ ऑक्टोबर २०२४ रोजी रद्द केली. यानंतर २८ ऑगस्ट २०२५ रोजी पवनार ते सांगली दरम्यानची आखणी कायम ठेवण्यास मान्यता देऊन उर्वरित आखणीचे उपलब्ध सर्व पर्याय व संभाव्य पर्यायांबाबत राज्य रस्ते विकास महामंडळाला अठवाल सादर करण्याचे आदेश दिले. रस्ते विकास महामंडळाने संबंधित लोकप्रतिनिधीशी चर्चा करून, प्रत्यक्ष स्थळ पाहणीनुसार विविध पर्यायी आखणींचा अभ्यास करून सुधारित आखणी अंतिम केली. त्यानुसार वर्षा, यवतमाळ, बीड व लातूर या जिल्ह्यांमधील आखणी कायम ठेवून अन्य जिल्ह्यांतील मूळ मंजूर आखणीत सुधारणा केली.
शिरोळ, हातकणंगले आणि कागल या प्रमुख तालुक्यांना वगळण्यात आले आहे. स्थानिक शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या तीव्र विरोधामुळे, तसेच सुपीक जमिनी वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, महामार्ग आता सातारा जिल्ह्या, पन्हाळा आणि चंदगड मार्गे वळवण्याचे नियोजन आहे. यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्यत्वे शिरोळ, हातकणंगले आणि कागल तालुक्यांतील जमिनी व वगळला आहे
Source link


