Mahesh Shinde | प्रिया शिंदे यांच्या जात पडताळणीवरून राजकारण नको; आमदार महेश शिंदेंचे माध्यमांना आवाहन

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या वादावर आमदार महेश शिंदेंचे प्रत्युत्तर
कोरेगाव – कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्या जात पडताळणी प्रकरणावर माध्यमांनी चर्चा थांबवावी, असे आवाहन केले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया नियमांनुसार व वैध असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
निवड प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडली असून अर्ज छाननीवेळी कोणताही आक्षेप नोंदवला गेला नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रिया शिंदे यांच्या वंशावळीमध्ये कुणबी समाजाच्या नोंदी असल्याचे सांगत अनावश्यक चर्चा टाळावी, असेही त्यांनी म्हटले.
महायुतीत किरकोळ नाराजी असली तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगला समन्वय असल्याचा दावा त्यांनी केला.
Source link

