Koynanagar forest | कोयना परिसरात ‘शतावरी’चा बहर! आयुर्वेदिक वनस्पतींच्या माहेरघरात निसर्गाची अनोखी उधळण

कोयना अभयारण्यातील बहुगुणी वनस्पती पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र
कोयनानगर : कोयना परिसरातील जंगल अनेक आयुर्वेदिक वनस्पतीचे माहेरघर आहे. सध्या येथील जंगलात अनेक आयुर्वेदिक वनस्पती फुलांनी बहरल्या आहेत. त्यातीलच एक बहुगुणी असणारी व कोयना परिसरात मुबलक प्रमाणात मिळणारी शतावरी ही वनस्पती फुलोऱ्याने बहरली असून ती पक्षी, किटक याबरोबरच मनुष्यालाही आकर्षित करीत आहे.
कोयना परिसरात मुबलक प्रमाणात मिळणारी शतावरी ही वनरपती सध्या आकर्षक फुलोऱ्याने बहरली असून हीवनस्पती बहुगुणी असल्याने ती महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरत आहे. शतावरी ही आयुर्वेदातील एक अत्यंत महत्त्वाची आणि ‘बहुगुणकारी औषधी वनस्पती असल्याने याला औषधींचा राजा मानले जाते.
शतावरी ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे. याच्या वेलीला काटे असतात आणि पाने सुईसारखी बारीक असतात. या वनस्पतीची मुळे जमिनीत गुच्छाने शंभरहून अधिक वाढतात, म्हणूनच याला
खबरदारी आणि तोटेजरी शतावरी नैसर्गिक असली, तरी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. ज्यांना कफचा त्रास जास्त आहे किंवा ज्यांचे पचन खूप मंद आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे. काही लोकांना याची अॅलर्जी असू शकते.
‘शतावरी’ (शंभर मुळे असलेली) म्हणतात. औषधासाठी प्रामुख्याने या मुळांचाच वापर केला जातोया वनस्पतीचे शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर फायदे होतात. महिलांसाठी मासिक पाळीच्या समस्या, हार्मोनल असंतुलन आणि प्रजननाशी संबंधित तक्रारींवर शतावरी गुणकारी आहे. गरोदर मातांमध्ये दूध वाढवण्यासाठी याचा विशेष वापर होतो. या वनस्पतींमध्ये अँटी ऑक्सिडंट्स भरपूर असतात ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. पचनशक्ती, पित्तशामक असल्यामुळे अॅसिडिटी, अल्सर आणि पोटाच्या जळजळीवर हे रामबाण औषध आहे. अशक्तपणा दूर करून शरीराला ऊर्जा आणि बळ देण्यासाठी शतावरी कल्प किंवा चूर्ण दुधासोबत घेतले जाते.
Source link


