Karad Municipal Council | कराड नगरपालिका ॲक्शन मोडवर! हॉकर्स संघटनेसोबत बैठकीनंतर मध्यरात्री नियोजित जागांची पाहणी

दत्त चौक ते स्मृतीसदन परिसर होणार अतिक्रमणमुक्त
कराड-गेली पाच वर्षे रखडलेल्या शहरातील हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी येथील नगरपालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. हातगाहाधारकांबरोबर झालेल्या दोन बैठकांनंतर गुरुवारी रात्री बसस्थानक परिसरात नगराध्यक्ष राजेंद्रसिंड यादव, उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, बांधकाम सभपाती अख्तर आंबेकरी, पाणी पुरवठा सभापती अल्ताफ शिकलगार यांच्यासह डॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. अतिक्रमण मोहीम राबवल्यानंतर शहरातील हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.
पहिल्या टप्यात दत चौक ते यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन परिसरातील हातगाडा, खोकीधारकांच्या पुनर्वसनाचा पहिला टप्पा हाती घेण्यात आला आहे.नगराध्यक्न राजेंद्रसिंड यादव यांनी सांगितले होते. त्यानुसार यादव यांनी गुरूवारी पालिकेत बैठक घेतली. त्यानंतर बसस्थानक परिसरातील नियोजित ‘हॉकर्स झोन संदर्भात प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्याच्या मागील परिसर, नवग्रह मंदिर परिसर, जुन्या राजमहाल थिएटरशेजारील परिसर, यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन परिसर या ठिकाणी हॉ कर्स झोन करण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू आहे.
Source link

