Uncategorized

Dharashiv News | मुक्या प्राण्यांची तहान भागवण्यासाठी वनविभागाची धडपड; ४५ ठिकाणी पाण्याची सोय

                                          मुक्या प्राण्यांची तहान भागवण्यासाठी वनविभागाची धडपड

धाराशिव उमरगा -उष्णतेच्या प्रमाणात कमालीचा बदल होत आहे. उन्हाचा चांगलाच पारा वाढत असल्याने पशु पक्षी यांच्यासह प्राण्यांची तहान भागवण्यासाठी उमरगा व लोहारा तालुक्यातील फॉरेस्ट क्षेत्रावर वनविभाग अंतर्गत ४५ पानवटे तयार करून पाण्याची सोय करण्यात आली आहे.

गरजेनुसार पानवटे भरून घेतले जात आहेत. वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मूळज या वनक्षेत्रांत वन विभागाने पुढाकार घेत टँकरद्वारे पाणीपुरवठा करून कोरडे पडलेले पाणवठे तुडुंब भरले आहेत.
वनविभागाकडून वन्यप्राण्यांसाठी अशा प्रकारे टँकरने कृत्रिम पाणवठ्यांत पाणी टाकले जात आहे.उन्हाचा फटका जितका नागरिकांना बसत आहे.

तितकाच पशुपक्षांनाही बसत आहे. यावरून वनविभागाचे पानवटे पशुपक्षी व प्राण्यांची तहान भागवण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. जे. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. असे वन परिमंडळ अधिकारी एस बी देशमुख यांनी सांगितले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​