Uncategorized

Asha Bhosale: संगीतसम्राज्ञी आशा भोसले यांचे चोरे गावाशी होते जिव्हाळ्याचे नाते


मंगेशकर घराण्याचा तेजस्वी वारसा लग्नानंतर भोसले आडनाव…

सातारा:  भारतीय संगीतविश्वावर ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली असून देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्या वयाच्या उत्तरार्धात होत्या.

आशा भोसले यांचे कराड तालुक्यातील चोरे गावाशी विशेष जिव्हाळ्याचे नाते होते. हेच त्यांचे सासर असून भोसले कुटुंबीयांशी त्यांनी शेवटपर्यंत स्नेहाचे आणि आपुलकीचे संबंध जपले.

आशा भोसले यांनी आपल्या व्यस्त कारकिर्दीतही चोरे गावाशी असलेले नाते कधीही विसरले नाही. दोन वर्षांपूर्वी त्या पाटण तालुक्यात देवदर्शनासाठी आल्या असता त्यांनी चोरे येथे थांबून भोसले कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्या भेटीतील संवाद आणि आठवणी आज कुटुंबीयांनी सांगितल्या. तसेच चोरे येथील भोसले कुटुंबीयांनी नव्याने बांधलेल्या घराला भेट देण्याची त्यांची इच्छा होती. घर पूर्ण झाल्यावर पुन्हा नक्की येईन, असे त्यांनी आश्वासन दिले होते. मात्र त्यांच्या अकस्मात निधनामुळे हे स्वप्न अपूर्णच राहिले, अशी भावनिक प्रतिक्रिया कुटुंबीयांनी व्यक्त केली.

भोसले कुटुंबातील आशा भोसले यांचे पुतणे चंद्रकांत बाबुराव भोसले यांनी सांगितले की, आशाताईंसोबत आमचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्याकडे आमचे येणे-जाणे होते. त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

लता मंगेशकर यांच्या भगिनी असलेल्या आशा भोसले या उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह मंगेशकर घराण्यातील प्रमुख व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांच्या आवाजाने हिंदी, मराठीसह विविध भाषांतील हजारो गाणी अमर झाली. चोरे गावातील गणपतराव भोसले हे मुंबईत शासकीय सेवेत कार्यरत होते. ते आशा मंगेशकर यांच्या शेजारी राहत होते. तबला वादनाच्या छंदातून ओळख वाढत गेली आणि पुढे त्या नात्याचे रूपांतर विवाहात झाले. त्यानंतर आशा मंगेशकर या चोरे गावच्या सून बनल्या.आशा भोसले आपल्यात नसल्या तरी त्यांच्या सुरेल आवाजाचा वारसा आणि चोरे गावाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते कायम स्मरणात राहील. त्यांच्या आठवणींनी भोसले कुटुंबीय आणि गावकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​