Mumbai Bangalore Highway | मुंबई-बेंगळुरू महामार्गावर ‘तिसरा डोळा’! ६७ किमीवर ११० कॅमेऱ्यांची नजर

उंब्रज -मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पेठ नाका ते शेंद्रे या सुमारे ६७ किलोमीटरच्या महामार्गावर आता तब्बल ११० कॅमेऱ्यांचा ‘तिसरा डोळा’ २४ तास कार्यरत राहणार आहे. तासबडे टोलनाक्यावर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सीसीटीव्ही आणि वाहतूक नियंत्रण यंत्रणेमुळे महामार्गावरील वाहतूक, वाहनांचीहालचाल, वेगमर्यादा तसेच विविध घटनांवर नियंत्रण कक्षातून सतत नजर ठेवता येणार आहे. पेठ नाका ते शेंद्रे या सुमारे ६७कि.मी.च्या अंतरात ६८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
त्याद्वारे २४ तास वाहतुकीवर लक्ष ठेवले जाणार आहे. याशिवाय प्रत्येक दहा किलोमीटर अंतरावर स्पीड मोजणी कॅमेरे बसविण्यात आले असून, त्यासाठी एकूण सात ठिकाणी स्वतंत्र स्पीड मॉनिटरिंग यंत्रणा उभारण्यात आली आहे. कोल्हापूर आणि पुणे या दोन्ही दिशांचा विचार करता एकूण ४२ स्पीड मोजणी वें मेरे वाहनांच्या वेगमर्यादिवर २४ तास लक्ष ठेवणार असल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली आहे.त्यामुळे ६८ सीसीटीव्ही आणि ४२ स्पीड मॉनिटरिंग कॅमेरे असे मिळून एकूण ११० कॅमेरे या संपूर्ण महामार्गावर कार्यरत राहणार आहेत.
तासवडेच्या नियंत्रण कक्षातून ६७ किलोमीटरवर नजर
तासवडे टोलनाक्यावर उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात मोठ्या स्क्रीनवर महामार्गावरील विविध ठिकाणच्या कॅमेऱ्यांचे दृश्य एकाच वेळी पाहता येते.उपलब्ध छायाचित्रांमध्ये विविध कॅमेऱ्यांचे लाइव्ड फुटेज, कॅमेरालोकेशनची यादी, प्लेबॅकची सुविधा तसेच पीटीझेड कॅमेऱ्यांचे नियंत्रण दिसून येते. त्यामुळे एखाद्या विशिष्ट ठिकाणी काही घटना घडल्यास त्या भागातील कॅमेऱ्यांवर लक्ष केंद्रित करून परिस्थितीचा आढावा घेता येणार आहे.
या अत्याधुनिक व्यवस्थेबरोबरच १०३३ हा टोल फ्री क्रमांक २४ तास प्रवाशांच्या सोबतीला उपलब्ध असल्याची माहिती टोल व्यवस्थापनाने दिली आहे.महामार्गावर प्रवास करताना अपघात, वाहन बिघाड, आपत्कालीन परिस्थिती किंवा अन्य अडचण निर्माण झाल्यास प्रवाशांना या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर महत्त्व
राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने १३ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या महत्त्वपूर्ण आदेशामुळे अशा तंत्रज्ञानाधारित देखरेख व्यवस्थेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात आली आहे.
Source link



