Uncategorized

दिल्लीतील कार अपघातात आमदार अभय पाटील जखमी

दिल्लीतील आप आमदारासह एकूण 6 जण जखमी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीतील ‘आयटीओ’ येथे रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या रस्ते अपघातात बेळगावचे आमदार अभय पाटील जखमी झाले. तसेच या अपघातात दिल्लीतील किराडीचे विद्यमान आमदार अनिल झा यांच्यासह सहा जण जखमी झाले. सुदैवाने, सर्वजण किरकोळ जखमी झाल्याने एक मोठी दुर्घटना टळली. मात्र, यात रस्ते अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. पोलीस आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने सर्व जखमींना तात्काळ जवळच्या एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

‘आयटीओ’ परिसरात रविवारी रात्री एक मोठा रस्ते अपघात झाला. पोलीस मुख्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरच भरधाव वेगाने जाणाऱ्या आणि नियंत्रणाबाहेर गेलेल्या स्विफ्ट कारने रस्त्याच्या मधोमध असलेला डिव्हायडर आणि लोखंडी रेलिंग तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या इनोव्हाला धडक दिली. दिल्लीतील आर्यनगरचे रहिवासी असलेले आशुतोष पांडे हे आपल्या पत्नी आणि दोन लहान मुलांसह स्विफ्ट कारमधून लक्ष्मीनगरहून आयटीओकडे जात होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ त्यांचे गाडीवरील नियंत्रण अचानक सुटले. स्विफ्ट कार भरधाव वेगाने असल्यामुळे ती डिव्हायडरला धडकली आणि रेलिंग ओलांडून थेट आयटीओकडून लक्ष्मीनगरकडे येणाऱ्या आमदारांच्या इनोव्हा कारला जाऊन धडकली. इनोव्हा कारमध्ये किराडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल झा आणि कर्नाटकचे आमदार अभय पाटील होते.

सीएनजी स्फोटामुळे अपघात?

प्राथमिक माहितीनुसार, सीएनजी सिलिंडरचा स्फोट किंवा तांत्रिक बिघाडामुळे गाडीचा तोल अचानक गेला असावा, असा अंदाज असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. अपघाताच्या ठिकाणी मोठा स्फोटाचा आवाज आणि किंकाळ्या ऐकू आल्याचे उपस्थितांनी सांगितले. आयपी इस्टेट पोलीस स्टेशनने या घटनेचा तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण, वाहनाचा वेग आणि सिलिंडरच्या स्फोटाचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार

या अपघातात दोन्ही वाहनांमधील सर्व सहा जण जखमी झाले. टक्कर इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागांचे पूर्णपणे नुकसान झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी आणि लोकांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. डॉक्टरांच्या मते सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले आहेत. अपघातानंतर ‘आयटीओ’ येथे काही काळासाठी वाहतूक ठप्प झाल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी क्रेनच्या मदतीने रस्त्यावरून अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक पूर्ववत केली.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​