Uncategorized

इराणविरोधात सर्वात मोठे आर्थिक निर्बंध

ट्रम्प यांची घोषणा : मदत करणाऱ्या देशावरही कारवाई : तेलतस्करी नेटवर्क निशाण्यावर

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरोधात आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक कारवाईची घोषणा केली आहे. इराणने कराराची संधी गमाविली असून आता त्याला आर्थिक स्वरुपात एकाकी पाडले जाणार आहे. इराणला मदत करणारे देश आणि संस्थांवरही कारवाई होणार असून यात बँका, कंपन्या, विमानतळ आणि सरकारी संस्था सामील असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

तेल तस्करी नेटवर्कवर कारवाई आणि रोख हस्तांतरण, चलन विनिमय, जहाजांची नोंदणी आणि बनावट कंपन्यांद्वारे इराणपर्यंत पोहोचणारी आर्थिक मदत रोखली जाणार असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

इराणच्या सैन्याला मोठे नुकसान

इराणच्या नौदल आणि वायुदलाचे मोठे नुकसान झाले आहे. इराणचे अनेक सैन्य कारखाने नष्ट झाले आहेत. इराणच्या चलनाची स्थिती अत्यंत खराब असून देश आर्थिक संकटात असल्याचे म्हणत ट्रम्प यांनी अमेरिकेच्या नव्या आर्थिक कारवाईला ‘इकोनॉमिक डी-डे’ ठरविले. याचा अर्थ अमेरिका इराणवर अत्यंत मोठा आर्थिक दबाव निर्माण करणार आहे. ट्रम्प यांनी इतर देशांना इराणला मदत करणे थांबविण्याचे आणि अमेरिकेसोबत या अभियानात सामील होण्याचे आवाहन केले आहे.

इराणवर काय प्रभाव पडणार?

अमेरिकेच्या नव्या कारवाईचा सर्वात मोठा प्रभाव इराणचा तेल व्यापार आणि पैशांच्या देवाणघेवाणीवर पडू शकतो. इराणच्या कमाईचा मोठा हिस्सा तेलविक्रीतून प्राप्त होतो. इतर देश, बँका, कंपन्यांनी अमेरिकेच्या कारवाईच्या भीतीने इराणसोबतचा व्यापार कमी केल्यास इराणसाठी कच्चे तेल विकणे आणि विदेशातून पैसे मिळविणे अवघड ठरू शकते. कच्च्यातेलाची तस्करी आणि बनावट कंपन्यांवर कारवाई झाल्यास इराणसाठी छुपा व्यापार करणे अवघड ठरेल. अमेरिका स्वत:च्या सहकारी देशांसोबत मिळून इराणला जगापासून आर्थिकदृष्ट्या एकाकी पाडण्याचा प्रयत्न करेल असे ट्रम्प यांचे सांगणे आहे.

इराणचे तेल तस्करी नेटवर्क

तेल विकून कमाई, ओळख लपवून पुरवठा

– इराण कच्चे तेल विकतो, परंतु थेट स्वत:च्या नावाने व्यापार केल्यास अमेरिकेच्या यंत्रणा सहजपणे त्याला ट्रॅक करू शकतात.

– याचमुळे मध्यस्थ, इतर कंपन्या आणि वेगवेगळ्या शिपिंग नेटवर्कद्वारे तेल खरेदीदारापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो.

तेलविक्रीतून प्राप्त रक्कम

-कच्ले तेलविक्रीतून प्राप्त कमाईला इराणपर्यंत पोहोचविणे हा या नेटवर्कचा सर्वात महत्त्वाचा हिस्सा असतो.

-याकरता बँकिंग चॅनेल, करेन्सी एक्सचेंज, मध्यस्थ आणि कॅश ट्रान्सफर यासारख्या मार्गांचा वापर केला जातो.

पूर्ण साखळी तोडण्याचा प्रयत्न

-अमेरिका तेलव्यापारात मदत करणारी जहाजं, कंपन्या आणि वित्तीय नेटवर्कवरही कारवाई करू इच्छित आहे.

-अमेरिकेच्या निर्णयाचा उद्देश इराणसाठी कच्च्या तेलाची विक्री आणि त्यापासून कमाई प्राप्त करणे अवघड ठरविणे आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​