वेंगुर्लेतील रोटरीयन राजेश घाटवळ यांना नॅशनल रोटरी चॅम्पीयनशी पुरस्कार

वेंगुर्ले (वार्ताहर) : रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे रोटेरियन तसेच डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ यांच्या उल्लेखनीय रोटरी सेवा, उत्कृष्ट नेतृत्व आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ‘National Rotary Champion – Certificate of Appreciation’ या मानाच्या पुरस्काराने पणजी येथील नोबोटेल हॉटेलच्या सभागृहात रोटरी इंटरनॅशनल प्रेसिडेंट ओलाइंका बाबालोला, रोटरी इंटरनॅशनल डायरेक्टर के पी. नागेश, रोटरी टिआएफ ट्रस्टी ए. एस. वेंकटेश यांच्याहस्ते गौरविण्यात आले.
यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ लेनी डिकॉस्टा माजी प तिपाल अरुण भंडारे, नासीर बोरसादवाला, गौरीश धोंड, डॉ. विनय पै-रायकर, शरद पै, संग्राम पाटील राजुभाई दोशी, भावी प्रांतपाल विक्रांत कदम, अशोक नाईक, डॉ. सुहास जोशी, वासुकी सानजी आदी मान्यवर उपस्थित होते.
रोटरीच्या माध्यमातून समाजसेवा, नेतृत्वगुण आणि पोलिओ निर्मुलन व रोटरीच्या विविध उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय सहभाग घेत त्यांनी रोटरीच्या कार्याला प्रभावीपणे पुढे नेले आहे. त्यांच्या समर्पित सेवाभावाची, नेतुत्वाची आणि रोटरीप्रती असलेल्या बांधिलकीची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारामुळे रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. राजेश घाटवळ यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रोटरी वेंगुर्ला मिडटाऊन क्लबचे प्रेसिडेंट अॅड. प्रथमेश नाईक व सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच रोटरी मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील रोटरी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
‘सेवा हीच खरी ओळख’ या रोटरीच्या विचाराला आपल्या कार्यातून अधोरेखित करणाऱ्या राजेश घाटवळ यांचा हा राष्ट्रीय सन्मान निश्चितच सर्व रोटेरियन्ससाठी प प्रेरणादायी आहे. असे गौरवोदगार मान्यवरांतून काढण्यात आले.
Source link



