Uncategorized

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात; तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या

सांगली : मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याच्या समारोपावेळी विटा येथे त्यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाला. आंबेगाव परिसरात स्वागतासाठी मोठी गर्दी झाल्याने ताफ्यातील वाहनांना अचानक ब्रेक लावावे लागले. त्यामुळे दोन ते तीन वाहने एकमेकांवर आदळली. त्यानंतर मागून आलेल्या एसटी बसने ताफ्यातील एका एर्टिगा कारला धडक दिल्याची माहिती आहे. या अपघातात एक कार्यकर्ता जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मनोज जरांगे पाटील विटा शहराच्या दिशेने येत असताना त्यांच्या स्वागतासाठी नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. ढोल-ताशा आणि झांज पथकासह सुमारे ३० जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत करण्यात आले. मोठ्या गर्दीमुळे महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला.

जरांगे पाटील यांचा ताफा पुढे जात असताना महामार्गावर अचानक काही वाहनांना ब्रेक लावण्यात आले. त्यामुळे मागील वाहने एकमेकांवर आदळली. त्याचवेळी मागून येणाऱ्या एसटी बसची ताफ्यातील एर्टिगा कारला जोरदार धडक बसली.

एर्टिगा कारचे मोठे नुकसान

एसटी बसच्या धडकेत एर्टिगा कारच्या पुढील आणि मागील भागाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर ताफ्यातील कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. कारमध्ये अडकलेल्या कार्यकर्त्याला बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

जरांगे पाटील सुरक्षित

या अपघातात मनोज जरांगे पाटील सुरक्षित असून त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले नसल्याची माहिती आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान,  या अपघातात मोठी दुर्घटना टळल्याने कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. अपघाताबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​