कॅनडात हिमांशी खुरानाचा मारेकरी अब्दुलला अटक

7 महिन्यांपासून होता फरार
वृत्तसंस्था
ओटावा
कॅनडाच्या टोरंटोमध्ये 30 वर्षीय भारतीय वंशाची महिला हिमांशी खुरानाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हत्येच्या जवळपास 7 महिन्यांनी फरार मुख्य आरोपी आणि मृत महिलेचा जोडीदार 32 वर्षीय अब्दुल गफूरीला टोरंटो विमानतळावरून अटक करण्यात आली.
हिमांशीचा मृतदेह मागील वर्षी 20 डिसेंबर रोजी कॅनडाच्या टोरंटो येथील घरातून हस्तगत करण्यात आला होता. हिमांशीचा जोडीदार अब्दुल गफूरी या हत्येनंतर फरार झाला होता. आंतराष्ट्रीय पोलीस यंत्रणांच्या मदतीने कॅनडाच्या पोलिसांनी अब्दुलला ताब्यात घेत त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंद केला आहे.
हिमांशीची 19 डिसेंबर 2025 रोजी रात्री हत्या करण्यात आली होती. स्ट्रॅचन एव्हेन्यू आणि वेलिंग्टन स्ट्रीट वेस्ट भागातून एक महिला बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांना राबविलेल्या शोधमोहिमेत त्याच भागातील एका घरात हिमांशीचा मृतदेह मिळाला होता.
Source link



