बांद्यात इनोव्हा गाडीसह १० लाखांचा अवैध गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त

बांदा/ प्रतिनिधी : जुना पत्रादेवी-बांदा रोडवरील आरोसबाग तिठ्याजवळ टोयोटा इनोव्हा गाडीतून होणारी गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक उघडकीस आणत १०,लाख २४, हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाक्यावरील पथकाने केली आहे.
याप्रकरणी ठाणे येथील एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. रितेश प्रभु म्हात्रे (वय ३५ वर्ष, रा, ठाणे). असे त्याचे नाव आहे.
राज्य उत्पादन शुल्क इन्सुली नाक्याच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, शुक्रवारी सकाळी ७:०० वाजता जुना पत्रादेवी-बांदा रोडवर संशयित वाहनांची तपासणी सुरू होती. या दरम्यान टोयोटा कंपनीची राखडी रंगाची इनोव्हा चारचाकी (एम एच ४३ऐ जे १८१९) अडवून तपासणी केली असता, गाडीच्या मागील सीटवर व डिकीमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे विविध ब्रँड लपवून ठेवल्याचे उघड झाले.
या कारवाईत ३० बॉक्स मध्ये एकूण ५४० बाटल्या अवैध दारू साठा मिळून आला. यामध्ये ४ लाख २४ हजार ८०० रुपयाची दारू, ६ लाख किंमतीचे इनोव्हा असा एकूण १०लाख २४ हजार ८००रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
याप्रकरणी रितेश प्रभु म्हात्रे (वय ३५ वर्ष, रा. ठाणे) याच्यावर गुन्हा
दाखल करून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
ही धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर आणि सिंधुदुर्ग अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक मिलिंद माळी, धनंजय साळुंखे, विवेक कदम तसेच जवान संदीप कदम, दीपक वायदंडे, सागर सूर्यवंशी, सतीश चौगुले आणि अभिषेक खत्री यांनी पार पाडली.
प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक मिलिंद माळी तपासणी नाका इन्सुली करत आहेत.
Source link



