Uncategorized

​इन्सुलि क्र. ४ केंद्र शाळेच्या दोन वर्ग खोल्या दुरुस्तीसाठी ५३ लाख रुपये मंजूर

​बांदा / प्रतिनिधी : इन्सुलि गावठण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, इन्सुलि क्रमांक ४ या केंद्र शाळेच्या दोन वर्गखोल्यांच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी महाराष्ट्र खनिज विकास निधीतून तब्बल ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या विशेष माध्यमातून हा भरीव निधी प्राप्त झाला आहे. यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांनी सातत्याने विशेष पाठपुरावा व प्रयत्न केले होते.
​गेली काही वर्षे इन्सुलि येथील या केंद्र शाळेच्या दोन वर्ग खोल्या अत्यंत नादुरुस्त व मोडकळीस आलेल्या अवस्थेत होत्या. पावसाळ्यात छतामधून पाणी गळणे, खिडक्या, दरवाजे व फरशीची दुरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणींचा सामना करावा लागत होता. शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी या दुरुस्तीबाबत प्रशासनाकडे वारंवार मागणी केली होती. अखेर शासनाच्या माध्यमातून ५३ लाखांचा निधी मंजूर झाल्याने पालक, शिक्षक व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात असून सर्व स्तरांतून शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे व आमदार दीपक केसरकर यांचे विशेष आभार मानले जात आहेत.
आज या कामाचे ठेकेदार विशाल पोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळेच्या ठिकाणी भेट देऊन इमारतीची आणि परिसराची पाहणी केली. सध्या सुरू असलेला पाऊस ओसरताच प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती ठेकेदारांकडून देण्यात आली. या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ.प्रांजल कांदे, सचिन पालव, संतोष मेस्त्री, केंद्रप्रमुख लक्ष्मीदास ठाकूर, मुख्याध्यापक रुपेश परब आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित ठेकेदार यांना योग्य पद्धतीने आराखड्या प्रमाणे काम करा. कामात उत्तम दर्जा असला पाहिजे. जेणेकरून काम आकर्षक होईल. ग्रामस्थ्यांचे सहकार्य राहील. असे नारायण राणे यांनी सांगितले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती, इन्सुलि केंद्र यांच्या वतीने नारायण राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​