Uncategorized

कबुलायतदार गावकर प्रश्न निकाली काढण्याबाबत १२ ऑगस्ट रोजी मंत्रालयात बैठक!

आंबोली प्रतिनिधी : आंबोलीसह चौकुळ, गेळे गावचा कबुलायतदार गावकर प्रश्न लवकर निकाली लागण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी शिवसेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख तथा चौकुळ गावचे सुपुत्र दिनेश गावडे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन केली. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येत्या १२ तारीखला महसूल आणि वन मंत्रालयाच्या संयुक्त बैठकीत याबाबत मंत्री संबंधित आमदार व खात्याचे सचिव, अधिकारी यांच्यात चर्चा घडवून याबाबत ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांनी त्यांची आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या समवेत भेट घेतली. यावेळी दिनेश गावडे यांनी कबुलायतदार गावकर प्रश्न लवकर निकाली लागण्याबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे लक्ष वेधीत त्वरीत कार्यवाही करण्याची मागणी केली. आमदार नितेश राणे यांनीही याबाबत अभ्यास दीपक केसरकर यांचे सोबत कबुलायतदार गावकर प्रश्न सोडण्याबाबत जातीनिशी लक्ष घालण्याची ग्वाही शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांना दिले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​