माडखोल गावातील फळपिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी

ओटवणे प्रतिनिधी : माडखोल गावातील शेतकरी बागायतदारांची प्रलंबित आंबा-काजू नुकसान भरपाई तात्काळ अदा करावी असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्यामुळे तसेच याबाबतचे लेखी पत्र जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आल्यामुळे माडखोल गावातील बागायतदार व शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुकारलेले आमरण उपोषण स्थगित केले.
माडखोल गावातील शेतकरी बागायतदारांनी जिल्हा दौऱ्यावर आलेले महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन फळपीक विमा योजनेतील प्रलंबित नुकसान भरपाई बाबत एका निवेदनाद्वारे त्यांचे लक्ष वेधले. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंबा-काजू नुकसानभरपाईबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे आमदार डॉ निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे उपस्थित होत्या.
यावेळी माडखोल विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन जीजी राऊळ, उपसरपंच भाऊ कोळमेकर, माजी सरपंच राजन राऊळ, बाळू शिरसाट, माजी उपसरपंच अनिल परब, संतोष राऊळ, सोसायटी संचालक आनंद राऊळ, प्रकाश नाईक, शैलेश राऊळ, हेमंत राऊळ, आनंद राऊळ, पांडुरंग राऊळ, बापू राऊळ, आनंद नाईक, विनेश तावडे, स्वप्निल राऊळ, प्रशांत माडखोलकर, जानू तेली, उत्तम सावंत, संतोष तेली, बंटी सावंत, आत्माराम लातये, भरत राऊळ, महेश राऊळ, दीपक राऊळ, बाबल सावंत, योगेश लाड, मनोज राऊळ यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Source link


