Uncategorized

राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार

नव्या मंत्र्यांच्या यादीसह हायकमांड सकाळी बेंगळुरात येण्याची शक्यता : शपथविधीची तयारी अंतिम टप्प्यात

त. भा. प्रतिनिधी

बेंगळूर

राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार सोमवारी होणार असून राजभवनात नव्या मंत्र्यांच्या शपथविधीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दरम्यान, नव्या मंत्र्यांची अंतिम यादी घेऊन अखिल भारतीय काँग्रेस समिती (एआयसीसी)चे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि रणदीप सिंह सुरजेवाला रविवारी रात्री उशिरा किंवा सोमवारी सकाळी बेंगळुरात दाखल होण्याची शक्मयता व्यक्त करण्यात आली.

तीन दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीला मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद उपस्थित होते. बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराच्या अंतिम स्वरुपावर चर्चा झाल्यानंतर रविवारी मंत्र्यांची यादी पाठविण्यात येईल आणि सोमवारी शपथविधीसाठी सर्व तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.

दिल्लीतील चर्चेनंतर राज्यातील काँग्रेस नेते बेंगळूरला परतले असून सोमवारी मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे अंतिम यादी स्वत: के. सी. वेणुगोपाल आणि रणदीप सिंह सुरजेवाला सुपूर्द करतील, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. हे दोन्ही नेते रविवारी रात्री किंवा सोमवारी सकाळी बेंगळुरात पोहोचतील. त्यानंतर मुख्यमंत्री ही यादी राज्यपालांकडे पाठवणार असून त्यानुसार नव्या मंत्र्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडेल, असे सांगितले जात आहे.

मंत्रिमंडळातील 18 पदे भरण्याचा निर्णय

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी यापूर्वीच सोमवारी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राजभवनातही या सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून सोमवारी सायंकाळी 6 वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. सध्या राज्य मंत्रिमंडळात 20 पदे रिक्त असून त्यापैकी दोन पदे रिक्त ठेवून 18 पदे भरण्याचा निर्णय काँग्रेस हायकमांडने घेतल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.

या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना अधिक संधी दिली जाण्याची शक्मयता आहे. सलग तीन ते चारवेळा निवडून आलेल्या अनुभवी आमदारांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची दाट शक्मयता असल्याचे काँग्रेसमधील सूत्रांचे म्हणणे आहे.

आज नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल : प्रियांक खर्गे

मंत्री प्रियांक खर्गे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाचे संकेत दिले. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारीच होणार आहे. नव्या मंत्र्यांचा समावेश असलेले नवीन मंत्रिमंडळ आज अस्तित्वात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​