Uncategorized

आचरा वाचनालयाचा चोखंदळ वाचक पुरस्कार निशा पटवर्धन यांना प्रदान

आचरा प्रतिनिधी : आचरा येथील श्री रामेश्वर वाचन मंदिर आयोजित चोखंदळ महिला वाचक पुरस्कार श्रीम. निशा यशवंत पटवर्धन यांना प्रदान करण्यात आला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देवून गौरविण्यात आले. हा पुरस्कार मारुती प्रभाकर आचरेकर स्मरणार्थ ॲड. सायली मारुती आचरेकर यांनी पुरस्कृत केला होता
यावेळी उपाध्यक्ष अशोक कांबळी पुरस्कर्त्या श्रीमती मृणालिनी आचरेकर, अथर्व आचरेकर, जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर, वैशाली सांबारी, दिपाली कावले, विरेंद्र पुजारे, साहित्यिक सुरेश ठाकूर सुरेंद्र सकपाळ, मंदार सांबारी, ग्रंथपाल विजया मयेकर, सहा.ग्रंथपाल महेश बापर्डेकर, समृद्धी मेस्त्री, स्वप्नील चव्हाण आदी उपस्थित होते.
श्रीम. पटवर्धन यांना धार्मिक पुस्तके वाचण्याची अत्यंत आवड असून ज्येष्ठ नागरिकांची सेवा तसेच प्राणीमात्रांची सेवा करण्यात त्यांना विशेष आनंद आहे. नियमितपणे वाचनालयात येऊन त्या धार्मिक पुस्तकांबरोबरच वैचारिक व चरित्रात्मक पुस्तके वाचण्यावर जास्त भर देतात. त्यांच्याकडे वक्तृत्व गुण जरी कमी असले तरीही त्यांना आवडलेल्या पुस्तकांवर त्या ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांबरोबर संवाद साधून आवडलेल्या पुस्तकाबाबत आपले मनोगत व्यक्त करत असतात. आपल्या घरच्या कामाबरोबरच सवड काढून त्या वाचनमंदिरात पुस्तके वाचण्यात त्या आपला बराचवेळ खर्च करतात आणि यामुळेच यावर्षीचा महिला चोखंदळ वाचक पुरस्कार श्रीम. निशा यशवंत पटवर्धन यांना जाहीर करण्यात आला होता.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​