Uncategorized

राजधानी एक्स्प्रेसचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत; सहा वर्षांनंतर पुन्हा मिळाला थांबा

सावंतवाडी वार्ताहर : सावंतवाडी रेल्वे स्थानकाला राजधानी एक्स्प्रेसचा थांबा पुन्हा मिळाल्यानंतर गुरुवारी प्रथमच ही रेल्वे स्थानकात दाखल झाली. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने राजधानी एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सहा वर्षांनंतर थांबा पुन्हा मिळाल्याने प्रवासी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. सकाळी ९.३० वाजता राजधानी एक्स्प्रेस सावंतवाडी स्थानकात दाखल होताच रेल्वेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच रेल्वेच्या दोन्ही चालकांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांना पेढे वाटून या आनंदाचा उत्सव साजरा करण्यात आला.

कोरोना काळात राजधानी एक्स्प्रेस आणि गरीबरथ एक्स्प्रेसचा सावंतवाडीतील थांबा बंद करण्यात आला होता. मात्र, कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राजधानी एक्स्प्रेस, गरीबरथ एक्स्प्रेस आणि मंगळुरू एक्स्प्रेसचे थांबे पुन्हा सुरू करण्यात यश आल्याचे संघटनेने सांगितले.

मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याचे संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी सांगितले. तसेच, स्थानकाला लोकनेते मधू दंडवते यांचे नाव देण्यात आले असून, त्यांच्या नावाला साजेसे कार्य या स्थानकातून घडावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर, ज्येष्ठ सल्लागार सुभाष शिरसाट, खजिनदार भूषण बांदिवडेकर, सिद्धेश सावंत, मिहीर गावडे, यश सावंत, संकेत सावंत, सरिता सावंत, प्रेरणा पोकळे, निधी धुरी, करण धुरी, श्री. तानावडे, मळगाव रिक्षा संघटनेचे पदाधिकारी तसेच कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने तीन गाड्यांना सावंतवाडी रोड स्थानकावर थांबा मिळाला त्यापैकी मंगळूर एक्सप्रेस यापूर्वी प्रथमत थांबली होती आता राजधानी एक्सप्रेस ला थांबा मिळाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे या गाड्यांना थांबा मिळाला असला तरी भाजपच्या गोटात श्रेयवादासाठी कोणतेही प्रयत्न झालेले नाही


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​