मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट

कणकवली / प्रतिनिधी : केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी परिवहन भवन नवी दिल्ली येथे भेट घेतली.
महाराष्ट्रातील बंदर क्षेत्राचा सर्वांगीण विकास, लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करणे, मत्स्य बंदरे व किनारी पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, किनारी जलवाहतूक व अंतर्गत जलमार्गांना चालना देणे, तसेच सागरी पर्यटनाच्या विकासाला गती देणे या दृष्टीने ‘सागरमाला २.०’ अंतर्गत विविध महत्त्वपूर्ण प्रकल्प प्रस्तावित आहेत. या विकास प्रकल्पांच्या अनुषंगाने विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.
‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेच्या अनुषंगाने सदरील प्रकल्पांचे महत्त्व लक्षात घेता, महाराष्ट्रातील विविध प्रकल्प मार्गी लावण्याची ग्वाही केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनवाल यांनी दिली.
Source link



