Monsoon Update | कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यभर पाऊस

त. भा. प्रतिनिधी पुणे
ओरिसा, झारखंड तसेच पश्चिम बंगालवर न्यून दाबाचे क्षेत्र कायम असून, याच्या प्रभावामुळे राज्यात बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे राज्यभर मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुढील तीन दिवस राज्यभर पावसाचा जोर राहणार आहे.
बंगालच्या उपसागरातील न्यून दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले असून, मंगळवारी ते ओरिसाच्या अंतर्गत भागावर होते. हे क्षेत्र पश्चिम-उत्तर पश्चिमेकडे सरकणार असून, याच्या प्रभावामुळे मध्य भारतात पावसाचा प्रभाव वाढला आहे. राज्यावर देखील बाष्पयुक्त वारे घोंघावत असून, याच्या प्र्रभावामुळे मंगळवारी राज्याच्या अनेक भागात पावसाचा मारा झाला.राज्याच्या अनेक भागात दिवसभर पावसाची
संततधार सुरुच होती.
दरम्यान, हे क्षेत्र हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे. त्यामुळे राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर राहणार आहे, यात बुधवारी चंद्रपूर, गेंदियह, गडचिरोली जिल्ह्dयात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्dयात जोरदार वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गुरुवारी जळगाव, चंद्रपूर, सातारा व पुणे घाट भागात ऑरेंज अलर्ट आहे, तर उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकणात जोरदार पाऊस अपेक्षित आहे, शुक्रवारी रायगड व पुणे घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट असून, उत्तर महाराष्ट्र, कोकण मध्य महाराष्ट्राच्या काही भागावर मध्यम स्वऊपाचा पाऊस पडणार आहे. शनिवारनंतर पावसाची तीव्रता कमी होणार आहे.
Source link



