Woman Molestation | “तुझा रेट काय”? कॅबची वाट पाहणाऱ्या महिलेला छेडल्याप्रकरणी एकास अटक

बंगरुळुमध्ये कॅबची वाट पाहत उभ्या असलेल्या एका महिलेला तुझा रेट काय असं विचारत छेडछाड केल्याची संतापजनक घटना राममूर्ती नगरमधून समोर आली आहे. पिडीत महिलेने या व्यक्तीला आपल्या मोबाईलमध्ये कैद केले असून याप्रकरणी एका ४२ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
संशयित आरोपी फळविक्रेता
पीटीआयच्या वृत्तानुसार , आरोपी विजय राघव हा राममूर्ती नगरमधील एनआरआय लेआउटचा रहिवासी असून तो एक फळ विक्रेता आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून, घटनेदरम्यान कथितरित्या वापरलेली स्कूटर जप्त करण्यात आली आहे.
Woman Alleges Harassment While Waiting for Cab in Bengaluru, Seeks Police Action
A woman has shared a video on social media alleging that she was harassed while waiting for her cab in Bengaluru. She claimed the accused, who was riding a vehicle bearing registration number KA03… pic.twitter.com/juc7uYhidl
— Karnataka Portfolio (@karnatakaportf) July 27, 2026
२७ जुलै रोजी त्या महिलेने इन्स्टाग्रामवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्या पोस्टमध्ये तिने आरोप केला आहे की, ती रस्त्याच्या कडेला थांबली असताना एक दुचाकीस्वार तिच्याजवळ आला, आणि महिलेवर अश्लील टिप्पणी केली आणि लैंगिक संबंधांच्या बदल्यात तिला पैसे देणार असल्याचे सांगितले.
व्हायरल व्हिडिओ अन् पोलिसांची कारवाई
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, तो माणूस त्या महिलेला, “तुझा रेट काय आहे?” असे विचारताना ऐकू येते. त्या महिलेच्या म्हणण्यानुसार, तिला धोका वाटल्यामुळे तिने लगेचच आपल्या मोबाईल फोनवर हा संवाद रेकॉर्ड करायला सुरुवात केली.



