Uncategorized

वजराठ पेडणेकरवाडीतील दिव्यांग रमेश पेडणेकर यांना ट्रायसायकल भेट

वेंगुर्ले/प्रतिनिधी : समाजातील दिव्यांग बांधवांना स्वावलंबी जीवन जगता यावे, त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी व्हाव्यात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडीच्या वतीने वेंगुर्ला तालुक्यातील वजराठ येथील पेडणेकरवाडीतील दिव्यांग रमेश पेडणेकर यांना ट्रायसायकल भेट देण्यात आली. या उपक्रमामुळे रमेश पेडणेकर यांच्या दैनंदिन हालचाली अधिक सुलभ होणार असून त्यांच्या जीवनात नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे सांगितले. दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी सातत्याने प्रयत्नशील असून, प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत योजना पोहोचविण्यासाठी पक्ष कार्यरत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी उपस्थित मान्यवर दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे म्हणाले कि दिव्यांग व्यक्तींना केवळ मदत करणे पुरेसे नसून त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले. अशा प्रकारचे उपक्रम समाजात संवेदनशीलता वाढविणारे असून गरजू व्यक्तींच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणतात, असेही त्यांनी नमूद केले.

ट्रायसायकल स्वीकारताना रमेश पेडणेकर यांनी भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडी तसेच सर्व सहकार्यकर्त्यांप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. या मदतीमुळे दैनंदिन जीवन अधिक सुलभ होईल आणि स्वतःची अनेक कामे स्वबळावर करता येतील, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या कार्यक्रमास भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे , ता.चिटणीस नितीन चव्हाण , शक्तिकेंद्र प्रमुख नितीन परब , मा.सरपंच सूर्यकांत परब , जेष्ठ कार्यकर्ते वसंत परब , विजय पेडणेकर, दिगंबर पेडणेकर , श्यामसुंदर पेडणेकर , हरी पेडणेकर , रवींद्र पेडणेकर , गुंडू पेडणेकर , विलास पेडणेकर , भूषण पेडणेकर , मकरंद गोंधळेकर , बापू पेडणेकर, अजय पेडणेकर, विकास पेडणेकर, दादा पेडणेकर, समीर कांदे, गोपाळ कांदे,मारुती पेडणेकर, विनायक पेडणेकर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, भाजपा दिव्यांग आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ तसेच रमेश पेडणेकर यांचे कुटुंबीय उपस्थित होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​