Uncategorized

उकळत्या पाण्याची नदी

हे जग अनेक आश्चर्यांनी भरलेले आहे. आपल्या कल्पनेच्या बाहेरच्या अनेक वस्तू किंवा स्थाने येथे आहेत. दक्षिण अमेरिकेतील देश पेरु येथे एक नदी अशी आहे, की जिचे पाणी नेहमी उकळत असते. या पाण्यात कोणता तरी प्राणी पडला, तर तो अक्षरश: भाजून निघतो, इतके या नदीच्या पाण्याचे तापमान आहे. ही नदी अमेझॉन नदीच्या परिसरातील जगातल्या सर्वात मोठ्या वर्षावनाचा एक भाग आहे.

या नदीचे पाणी सर्वत्र इतके उष्ण असते असे नाही. नदीच्या काही भागातील पाणी मात्र प्रचंड उष्ण असते. या भागांमध्ये तिचे तापमान जवळपास उकळत्या पाण्याच्या तापमानाशी साम्य साधणारे असते. त्यामुळे नदी ओलांडणारे प्राणी हे भाग टाळतात. या नदीचे नाव ‘शानाय टिम्पिश्का’ अर्थात उकळती नदी असेच आहे. आपल्या भीतीदायक वैशिष्ट्यांमुळे ही नदी जगातील संशोधकांच्या आणि पर्यटनप्रेमींच्या चर्चेचा विषय अनेक दशकांपासून बनली आहे. या नदीचे तीन चार भाग असे आहेत, की जिथे पाण्याचे तापमान 100 डिग्री सेल्शियसच्या आसपास असते. त्यामुळे ते अत्यंत धोकादायक असते. या भागांमध्ये चुकुन छोटे प्राणी किंवा कृमीकीटक पडल्यास ते जगण्याची शक्यता दुरापास्त असते. इतके उष्ण पाणी असणारी ही जगातील कदाचित एकमेव नदी असावी असे मानले जाते. विशेष बाब अशी, की या नदीच्या आसपास कोठेही सक्रीय ज्वालामुखी नाही. साधारणत: जागृत ज्वालामुखीच्या सान्निध्यात जे जलस्रोत असतात, ते उष्ण असू शकतात. कारण ज्वालामुखीची उष्णता त्यांना सातत्याने मिळत असते. अनेक देशांमध्ये अशा प्रकारे उष्ण पाण्याच्या झऱ्यांची निर्मिती झाली आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​