Uncategorized

शस्त्रसंधी संपुष्टात ट्रम्प यांची घोषणा :

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचेही प्रत्युत्तर

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी, तेहरान

अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा युद्धाचा भडका उडाला आहे. मंगळवारी इराणने तीन तेलवाहू नौकांवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने इराणमधील 80 स्थानांवर जोरदार वायुहल्ले केले आहेत. प्रत्युत्तर म्हणून इराणनेही कुवेत आणि बहारिन येथील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला चढविला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी आता संपली आहे, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये हल्ल्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. युद्ध पुन्हा भडकल्याने कच्च्या इंधन तेलाच्या दरात 6 टक्के वाढ झाली असून भारतातील शेअरबाजारांची घसरण झाली आहे.

इराणचे नेतृत्व युद्धखोर असून आता त्या देशाशी शांतता चर्चा केली जाणार नाही. त्या देशाशी काही दिवसांपूर्वी करण्यात आलेली शस्त्रसंधी संपुष्टात आली आहे. इराणचे नेते मूर्ख आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्यात आम्ही वेळ वाया घालविला, अशी आमची भावना झाली आहे. तथापि, शस्त्रसंधी संपली असली, तरी आम्ही चर्चा पुढे चालू ठेवण्यासाठी सज्ज आहोत. पण आता इराणवर विश्वास ठेवला जाणार नाही, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्किये या देशात आयोजित नाटो परिषदेत दिला. यापुढे अमेरिका इराणशी कोणत्याही प्रकारची चर्चा करणार नाही, असेही प्रतिपादन डोनाल्ट ट्रम्प यांनी केलेले आहे.

अण्वस्त्राचा धोका

इराणला कधीही अण्वस्त्र बनवू दिले जाणार नाही, अशी अमेरिकेची भूमिका आहे. इराणचे नेते अतिरेकी आहेत. त्यांच्यापाशी अण्वस्त्र निर्माण झाल्यास ते त्याचा उपयोग केल्यावाचून राहणार नाहीत. त्यांच्याशी चर्चा करणेच व्यर्थ आहे, अशी निदान माझी तरी भावना आहे. अमेरिका अद्यापही चर्चा करण्याच्या मन:स्थितीत आहे. तथापि, चर्चेचा काही उपयोग होईल असे वाटत नाही. मी माझ्या मध्यस्थांशी या संबंधात चर्चा करणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी पुस्तीही डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो परिषदेत केलेल्या भाषणात जोडली.

अमेरिकेचे इराणवर हल्ले

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल वाहतूक करणाऱ्या तीन नौकांवर इराणने मंगळवारी रात्री उशिराने क्षेपणास्त्र हल्ला केला होता. त्यामुळे अमेरिकेने इराणला तेल विकण्यासाठी दिलेली अंतरिम अनुमती मागे घेतल्याची घोषणा केली. त्यामुळे इराणवर पुन्हा आर्थिक प्रतिबंध लागू केले जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेने बुधवारी इराणच्या 80 स्थानांवर युद्ध विमाने आणि क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने हल्ले केले आहेत. या स्थानांमध्ये इराणमधील काही शस्त्रागारे आणि क्षेपणास्त्र निर्मिती केंद्रांचाही समावेश आहे. या हल्ल्यामुळे इराणमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या आगी लागल्या आहेत.

इराणचे प्रत्युत्तर

अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर काही तासांच्या आतच इराणनेही कुवेत आणि बहारीन या देशांमधील अमेरिकेच्या सैनिकी तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचे हल्ले चढविले आहेत. तथापि, बहुतेक हल्ले निकामी करण्यात आले आहेत, असे बहारिन या देशाने स्पष्ट केले. कुवेतने इराणचा निषेध केला असून इराणच्या या कृतीमुळे मध्यपूर्वेत पुन्हा अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे, असा इशारा दिला आहे.

शांतता कराराचे काय होणार…

अमेरिका आणि इराण यांच्यात साठ दिवसांची शस्त्रसंधी झाली होती. या साठ दिवसांच्या कालावधीत अंतिम शांतता करार केला जाणार होता. इराणचे दिवंगत धार्मिक नेते अयातोल्ला खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दोन्ही देशांमध्ये चर्चा केली जाणार होती. तथापि, आता दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केल्याने चर्चेचे भवितव्य डळमळीत झाले आहे. चर्चा फिस्कटल्यास युद्ध आणखी भडकण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त होत आहे.

तेलदरात वाढ, शेअरबाजारात घसरण 

ट्रम्प यांच्या शस्त्रसंधी संपुष्टात आल्याच्या घोषणेनंतर जागतिक बाजारपेठेत कच्च्या इंधन तेलाचे दर वाढले आहेत. दरांमध्ये 6 टक्के वाढ होऊन ते 77 डॉलर्स प्रतिबॅरल पर्यंत पोहचले आहेत. संघर्ष थांबला नाही, तर आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे. भारताच्या शेअरबाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 1,800 अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा सूचकांक निफ्टीमध्येही 400 अंकांची तूट दिसून आली. यामुळे गुंतवणूकदारांना फटका बसला आहे. जागतिक शेअरबाजारांवरही परिस्थितीला मिळालेल्या कलाटणीचा विपरीत परिणाम झाला.

युद्धाचा पुन्हा भडका

ड मध्यपूर्वेत अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाचा पुन्हा उडाला भडका

ड इराणशी पुन्हा चर्चा करणार नाही, अशी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

ड अमेरिकेचे इराणच्या 80 स्थानांवर ड्रोन, क्षेपणास्त्र आणि युद्धविमान हल्ले

ड इराणकडून कुवेत आणि बहारिन येथील अमेरिकन सैनिकी तळांवर हल्ले

ड अंतिम शांतता कराराचे भवितव्य धोक्यात, चर्चेविषयीही साशंकता व्यक्त

ड संयुक्त अरब अमिरातीकडून कुवेत, बहारिनवरील हल्ल्याचा तीव्र निषेध

ड युरोपियन महासंघाचे शांततेचे आवाहन, भारताचे परिस्थितीवर सूक्ष्म लक्ष


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​