Uncategorized

समुद्रकिनारी वाळूत गाडलेला होता क्रूर रणगाडा

हिटलरच्या काळातील रणगाडा : बॅरलवल 17 शिकारांच्या खुणा

जर्मनीच्या नॉर्थ सीच्या खडकाळ किनाऱ्यावर निर्मितीकार्य सुरू असताना कामगारांना वाळूखाली दडलेला अत्यंत मोठा नाझी रणगाडा मिळाला आहे. पुरातत्वतज्ञांनी या रणगाड्याला सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. संशोधनानुसार हा दुसऱ्या महायुद्धातील सर्वात धोकादायक रणगाडा स्टर्मशेगुट्ज 3 आहे. हा रणगाडा मागील 80 वर्षांपासून नॉर्थहोलेज नेवल एअरबेसनजीक वाळूत दडलेला होता. या रणगाड्याच्या गन बॅनरवल 17 पांढऱ्या खुणा आहेत, या नाझी रणगाड्याने शत्रूच्या नष्ट केलेल्या 17 रणगाड्यांशी संबंधित या खुणा असल्याचे तज्ञांचे मानणे आहे.

या रणगाड्याची स्थिती अत्यंत चांगली असल्यावर यावर ओरिजिनल कॅमाफ्लाज पेंट स्पष्टपणे दिसून येतो. या रणगाड्यातील दृश्य अत्यंत चकित करणारे आहे आणि आत खूपच कमी जागा शिल्लक असल्याचे कक्सहेवनचे पुरातत्व संचालक एंड्रियास ह्यूसर यांनी सांगितले आहे.

हा रणगाडा दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचे सर्वाधिक तयार केले जाणारे व्हीकल होते. राइनमेटल या संरक्षण कंपनीने युद्धादरम्यान 9 हजारांहून अधिक असे रणगाडे निर्माण केले होते. या रणगाड्याची गन एकाच ठिकाणी कायम असायची आणि ती वळू शकत नव्हती. निशाणा साधण्यासाठी 4 सैनिकांना पूर्ण रणगाडाच फिरवावा लागत होता. आत अत्यंत कमी जागा असूनही या रणगाडयाने युद्धात मोठा विध्वंस घडवून आणला होता.

महायुद्ध संपल्यावर विजयी झालेले सैन्य अनेकदा शत्रूच्या शस्त्रास्त्रांना वाळूत गाडत होते. कोरडी वाळू आणि उतारामुळे हा रणगाडा इतक्या वर्षापर्यंत गंज लागण्यापासून वाचला. याच्याजवळ छोटे गोळे आणि स्फोटकेही मिळाली आहेत. इतक्या पूर्ण स्थितीत कुठलाही रणगाडा मिळणे अत्यंत दुर्लभ आहे. आता या रणगाड्याला ऑगस्टमध्ये पुढील कामासाठी मुंस्टर येथे पाठविण्यात येईल. यानंतर त्याला ड्रेसडेनच्या मिलिट्री हिस्ट्री म्युझियममध्ये लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार असल्याचे ह्यूसर यांनी सांगितले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​