Uncategorized

Nashik Rain | नाशिकवरील ढगफुटीचं संकट टळलं! पाऊस पाडणारा ‘तो’ भोवरा वळाला; पण ‘या’ भागात धो-धो पाऊस सुरूच

नाशिक -राज्यात पावसाने कहर केला. अनेक जिल्ह्यांमध्ये आज शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली.. आज भारतीय हवामान विभागाकडून नाशिकला मोठा इशारा देण्यात आला. आज नाशिकमध्ये ढगफुटीसारखा पाऊस होण्याचा अंदाज आहे. प्रशासनाकडून सातत्याने घराबाहेर न पडण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या जात आहेत. काल मुंबई पुणे महामार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. नाशिकमध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला. ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि कॉलेजला सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या. गडकिल्ल्यांवर जाण्याचे टाळा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले.. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नाशिक जिल्ह्यात आज ढगफुटी होण्याच्या अंदाज आहे.

हवामान खात्याने सोमवारी नाशिकमध्ये एका दिवसात 350 मिलीमीटर म्हणजे ढगफुटीसदृश पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. काल रात्रभर नाशिकमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे. मंगळवारी सकाळी पावसाने नाशिक शहराच्या परिसरात विश्रांती घेतली असली तरी त्र्यंबकेश्वर, कसारा आणि इगतपुरी या परिसरात सध्या प्रचंड पाऊस पडत आहे. काल हवामान खात्याने पालघरमध्ये मोठ्याप्रमाणावर पावसाला कारणीभूत असणारा भोवरा (Vortex) मंगळवारी नाशिक परिसरात सरकेल, असे भाकीत वर्तवले होते. मात्र, आता भोवरा वेगळ्याच दिशेने वळाल्याने नाशिकवरील अतिवृष्टीचे संकट टळण्याची शक्यता आहे. 

काल पालघरमध्ये सुमारे 450 मिमी पाऊस पाडणारा आणि त्र्यंबकेश्वर–नाशिक मार्गे जाण्याची शक्यता असलेला भोवरा (Vortex) आता उत्तर दिशेला सुरतकडे आणि दक्षिण दिशेला अकोले (अहिल्यानगर) परिसराकडे सरकल्याचे दिसत आहे. घाटमाथ्यावर अद्यापही मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, एकूण परिस्थिती सध्या नियंत्रणात असून तुलनेने समाधानकारक राहिली आहे.

दरम्यान, मुसळधार पावसाचा बोगदा दुसऱ्या दिशेला सरकल्याने मंगळवारी नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी धोका काही प्रमाणात कमी होणार आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वरच्या दिशेने वाहून येणारे ढग गुजरातच्या सुरत आणि अहिल्यानगरच्या अकोलेच्या दिशेने सरकत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तरीदेखील नाशिक, इगतपुरी त्रंबकेश्वर भागात मुसळधार पर्जन्यवृष्टी कायम राहणार आहे. पावसाचा जोर कायम राहणार असल्यानं नागरिकांनी विनाकारण घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गंगापूर धरण सध्या ३७ टक्के भरले

नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण सध्या ३७ टक्के भरले असून, दारणा धरणातील पाणीसाठा २१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर भावली धरण ५६ टक्के क्षमतेपर्यंत भरले आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमधील एकूण पाणीसाठा आता २८ टक्क्यांवर पोहोचल्याने प्रशासनाने धरण क्षेत्रावर बारकाईने लक्ष ठेवले आहे.

दुसरीकडे, हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून, त्यामुळे नार नदीला पूर आला आहे. नदीवरील फरशी पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. पुढील काही तासांतही जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​