Uncategorized

Mumbai Monsoon मुसळधार पाऊस, १० जणांचा मृत्यू अन् घरीच राहण्याचं आवाहन, मुंबईच्या पावसाचा IMD चा धडकी भरवणारा अंदाज

स्कूल बसवर झाड कोसळून ११ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आणि दोनच दिवसांनी मॅनहोलमध्ये पडून एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू  झाला. कित्येक ठिकाणी पावसाचे पाणी साचले असताना एक मालवाहू वाहनही रस्ता खचून पाण्यात नाहीसे झाले.

मुसळधार पावसात जीवीतहानी आणि वित्तहानी सुरु असताना रविवारी रात्री मुंबईच्या मानखुर्दमध्ये चाळ कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. एका बाजूला मुसळधार पाऊस असताना दुसऱ्या बाजूला नागरी दुर्घटनांचे सत्र सुरुच असल्याने मुंबईकर भयभीत झाल्याचे चित्र दिसत आहे.

दोन आठवड्यांपेक्षा कमी काळात मुंबईत वार्षिक पावसाच्या जवळपास ६० टक्के पाऊस झाला आहे. वस्त्यांमध्ये पाणी साचले असून जनजीवन ठप्प झाले आहे . मुंबईतील दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने रहिवाशांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. परंतु, मुंबई आणि तिच्या उपनगरांसाठी हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईतील पावसाचा हा हाहाकार अजून संपलेला नाही.

हवामान विभागाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुढील काही दिवसांत अति मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने आज महाराष्ट्रातील आठ जिल्हयांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. यामध्ये मुंबई , पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि नाशिक तसेच पुणे व सातारा येथील घाटांचा समावेश आहे . रायगड, पालघर आणि पुण्यातील घाटांसाठी हा रेड अलर्ट दोन दिवसांसाठी आहे. हवामान विभागाने अनेक भागांमध्ये अचानक पूर येण्याची शक्यताही वर्तवली आहे.

सरासरीपेक्षा तिप्पट पाऊस

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भीषण परिस्थितीचा सामना करण्यासाठी घरीच थांबण्याचं आवाहन केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, राज्यात ८ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, ही परिस्थिती ‘अभूतपूर्व’ आहे.

राज्य आपत्कालीन कार्य संचालन केंद्रात झालेल्या आढावा बैठकीनंतर बोलताना फडणवीस म्हणाले, “हा अति तीव्रतेचा पाऊस असून, तो सरासरीपेक्षा जवळपास तिप्पट आहे. परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून अहोरात्र कार्यरत आहे.”


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​