अमेरिका-इराणमध्ये पुन्हा शाब्दिक ‘वॉर’

ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर इराणचे सडेतोड प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन, तेहरान
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीवेळी तेहरानच्या रस्त्यांवर उतरलेल्या प्रचंड गर्दीने संपूर्ण जग थक्क झाले असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. खामेनींच्या अंत्यविधीच्या वेळी त्यांना इराणच्या संपूर्ण सर्वोच्च नेतृत्वाला ‘एका गोळीत’ संपवण्याची संधी मिळाली होती, असा दावा ट्रम्प यांनी केला. तथापि, भविष्यातील राजनैतिक शक्यतांचा विचार करून त्यांनी तसे न करण्याचा निर्णय घेतला, असेही ते म्हणाले.
अमेरिका सध्या तेहरानमधील अंत्यविधीच्या घटनांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. याचदरम्यान ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या त्या सर्वांना आम्ही एका गोळीत संपवू शकलो असतो, पण आम्ही तसे करणार नाही, असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले आहे. तसेच जर त्यांनी संपूर्ण नेतृत्व संपवले, तर भविष्यातील कोणत्याही करारासाठी किंवा वाटाघाटीसाठी कोणीही शिल्लक राहणार नाही, असा युक्तिवादही राष्ट्राध्यक्षांनी केला. ट्रम्प यांच्या मते, इराण सध्या प्रचंड दबावाखाली असून करारासाठी ‘याचना’ करत आहे. मात्र, ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर इराणनेही अचूक प्रत्युत्तर देताना अमेरिकेच्या वर्तणुकीत सभ्यता आणि आदर मुळीच नसल्याचा प्रतिहल्ला चढवला.
लाखो लोकांकडून अंत्यदर्शन
खामेनी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखो लोक तेहरानच्या रस्त्यांवर उतरले आहेत. इराणच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत अंदाजे दीड कोटी लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शोकमग्न वातावरणात विविध शहरांमधून अंत्ययात्रा निघालेली असताना इराणमध्ये संतापही उफाळून आला आहे. अंत्ययात्रेतील लोक ‘अमेरिकेचा नाश होवो’ आणि ‘इस्रायलचा नाश होवो’ अशा आशयाच्या घोषणा देत आहेत. याचदरम्यान काही जण मागण्यांचे फलक घेऊन उभे असलेले दिसून येत आहेत.
Source link



