Uncategorized

लोहगड हत्याप्रकरणाला नवं वळण

पुणे – पुण्यातील चर्चित व्यावसायिक केतन अग्रवाच्या हत्याकांडात रोज नवनवे खुलासे होताना दिसत आहे. सध्या सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी हे दोघे पोलीस कोठडीत असून चौकशी दरम्यान त्यांनी अनेक महत्वाची गुपितं उलगडली. केतनची हत्या करण्याचा निर्णय हा अचानक घेण्यात आला नव्हता, तर त्यामागे अनेक दिवसांच सुनियजोति, काटेकोर प्लानिंग होतं, असं आता समोर आलंय. त्यातच सियाने असे काही खुलासे केलेच जे खरच खूप हैराण करणारे आहेत. सियाच्या सांगण्यानुसार, तिने केतनला सगळं काही सांगितलं होतं, आपल्याला हे लग्न करायचं नाही, असंही केतनला सांगितलं होतं, मात्र तो तयार नव्हता, असं सियाने चौकशीत कबूल केले होते अशातच आता सियाची आईने एक खुलासा केला आहे, ज्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळ वळण  लागल्याचे पाहायला मिळत आहे..

पुण्यातील लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याप्रकरणात आता आरोपी सिया गोयलच्या आईने महत्त्वाचे दावे केले आहेत. सियाची आई पूजा गोयल यांनी सांगितले की, घटनेच्या आदल्या रात्री सिया आणि केतन यांच्यात व्हिडिओ कॉल झाला होता. या कॉलमध्ये लोहगड ट्रेकबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी सियाने ट्रेकला जाण्याची इच्छा नसल्याचे सांगितले होते. मात्र, केतनच्या आईने तिला समजावून ट्रेकला जाण्यासाठी तयार केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पूजा गोयल यांच्या म्हणण्यानुसार, हा संपूर्ण संवाद चॅट रेकॉर्डमध्येही असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सियाने ट्रेकला जाण्यास नकार दिला होता, तर केतन तिला तयार करण्याचा प्रयत्न करत होता, असेही त्या म्हणाल्या.याच लोहगड किल्ल्यावर ट्रेकदरम्यान केतन अग्रवालची हत्या झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनला कड्यावरून ढकलल्याचा आरोप असून, पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, पूजा गोयल यांनी सिया आणि केतनच्या नात्याबाबतही महत्त्वाचा खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाची तयारी सुरू होती आणि सर्वजण या विवाहाबद्दल आनंदी होते. केतनचे कुटुंब सियाला प्रेमाने आणि आदराने वागवत होते. सियानेही या लग्नाबाबत कधीच नाराजी व्यक्त केली नव्हती, असा दावा त्यांनी केला.

मात्र, या प्रकरणातील सर्व आरोपांवर अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार असून, सध्या पोलिसांकडून या हत्येचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​