Uncategorized

संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावरून राजकीय वाद

मुंबई – ठाकरे गट शिवसेनेला रामराम ठोकत शिंदेसेनेत प्रवेश करणारे खासदार संजय दिना पाटील पत्रकारांना केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलेच गोचीत सापडल्याचे पाहायला मिळत आहे.. मुंबईत पत्रकारांना अर्वाच्च भाषेत दमदाटी करतानाचा त्यांचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर तीव्र संताप व्यक्त केला. विरोधकांनी त्यांच्यावर या वक्तव्यावर टीकेची झोड उठल्यानंतर अखेर संजय दिना पाटील यांनी समाजमाध्यमांवरून शेअर केलेल्या पोस्टमधून दिलगिरी व्यक्त केली… यावर मंत्री उदय सांमत यांनी प्रतिक्रिया देत त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसुन आले..

काय म्हणाले मंत्री उदय सांमत ?

मंत्री उदय सांमत म्हणाले संजय दीना पाटलांना तुम्ही जवळुन पाहीले,तर समजेल त्यांच्या वागण्याची पध्दत तशी आहे, त्यांची बॉडी लॅवेंज तशी आहे.. त्यांनी जाहीर पध्दतीने दिलगीरी व्यक्त केली आहे.. त्यांनी पत्रकांरांच्या बाबतीत जे काही बोलले आहे, त्याचे पक्षाने कोणतेही समर्थन केलेलं नाही.. त्याच्यामुळे संजय दीना पाटलांनी स्वता: दिलगीरी व्यक्त केल्यामुळे तो विषय सगळ्यांनी थांबवणे गरजेचे आहे…

पुढे मंत्री सांमत म्हणाले,संजय दीना पाटलांसारखा जीवाला जीव देणारा मित्र होऊ शकत नाही. मी काल त्यांच्याशी काल चर्चा केली, साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली, साहेबांनी त्यावर खुलासा केला आहे.संजय पाटलांनी स्वता: दिलगीरी व्यक्त केलेली आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, की भविष्यात राजकारण करत असताना त्याच्याकडुन अशा पध्दतीची भुमिका घेतली जाणार नाही अशी देखील चर्चा साहेबांनी त्यांच्यासोबत केली आहे… आज ते आमच्या पक्षाचे खासदार आहेत. त्यांच्या वक्तव्याने अनेकांची मन दुखावली आहेत, यांची मला कल्पना आहेत त्यांचा स्वभाव तसा नाही आहे.ते अतिशय दिलदार मित्र आहेत. तरी देखील त्यांच्या बोलण्याने कोण दुखावले असेल तर मी दिलगीरी व्यक्त करतो असे म्हणत मंत्री उद्य सांमत यांनी संजय दीना पाटलांच्या असभ्य वागण्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे..

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​