Solapur Muharram | लहान मुले बनतात ‘वाघ’ आणि फेडला जातो नवस; सोलापूरकरांनी जपली ‘ही’ अनोखी परंपरा !

सोलापूर: गेल्या अनेक वर्षांपासून सोलापुरात मोहरम सण अनोख्या पद्धतीने साजरा केला जात आहे. मोहरम मध्ये हिंदू – मुस्लिम धार्मिक एकात्मतेचे दर्शन यावेळी पाहायला मिळते. मोहरमला वाघासारखं सजवून नवस फेडले जातात आणि सोलापूरकरांनी ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून जपली आहे.
सोलापूर शहरातील कुंभार वेस येथे असलेल्या बडे मौलाली दर्ग्याला हिंदू आणि मुस्लिम भाविक आपल्या मुलांना वाघासारखं रंगवून, गळ्यात हार आणि दोन्ही हातांना मोरांचे पंख बाधून दर्ग्यात दर्शन घेण्यासाठी घेऊन जातात. मोहरममध्ये नवसाचे वाघ सजवून नवस फेडण्याची परंपरा गेल्या 300 वर्षाची आहे,
यामध्ये वृद्ध व युवक हातालाही फक्त वाघासारखे सजवतात वाघ सजवण्याचे काम सोलापुरातील समाचार चौक येथे केले जाते मोहरम सणाच्या काळात या चौकामध्ये हिंदू व मुस्लिम बांधव ही परंपरा पार पाडण्यासाठी व नवस फेडण्यासाठी आपल्या शरीरावर वाघासारखी रंगरंगोटी करून घेतात
Source link



