गगनबावड्यात पावसाचा दमदार कमबॅक

गगनबावडा : गेल्या १५ दिवसांपासून शेतकरी व नागरीक पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. पण लांबलेल्या पावसाने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळवले होते. मात्र मंगळवारी सकाळपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.
दरम्यान, या पावसामुळे करपून चाललेल्या तरव्यांना तसेच अन्य पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता दूर झाली आहे. या पावसाने शेतकऱ्याला चिंतामुक्त केले असून जिल्ह्याच्या विविध भागात आता शेती कामाला वेग आला आहे.गगनबावडा तालुक्यातपाऊस सक्रिय झाला आहे. दुस्रया दिवशी संततधार वाढली आहे. पठारी भागात शेताशिवारात पाणीच पाणी झाल्याने बळीराजा सुखावला आहे.
गगनबावडा लखमापूर, तळीये, बोरबेट दरम्यानच्या पठारी भागात जोरदार पाऊस झाला. करुळ, भूईबावडा या दोन्ही घाट मार्गात जोरदार पाऊस झाला. असाच जोर कायम राहिला तर दोनच दिवसांत येथील नद्या, ओढे, नाल्यातील पाणी प्रवाहित होणार आहे. शेताशिवारात ओलावा निर्माण झाल्याने बराच काळ रखडलेल्या खरीप हंगामातील कामांना गती मिळणार आहे. मशागतीची कामे सुरु होणार आहेत. शेतीकामांची धांदल सुरू होणार आहे. मान्सूनसक्रीय झाल्याने येथील शेतकरी वर्ग सुखावला आहे.
Source link



