Uncategorized

अर्जेंटिनाची ऑस्ट्रियावर 2-0 ने मात

एक सामना बाकी असतानाच बाद फेरीत प्रवेश, दोन्ही गोल मेस्सीकडून

वृत्तसंस्था 

आर्लिंग्टन, टेक्सास : गोल करणे आणि विक्रम मोडणे हे लायोनेल मेस्सीचे वैशिष्ट्या आहे आणि आपल्या सहाव्या विश्वचषकातही तो पुन्हा एकदा तेच करत आहे.  आणखी एका उत्कृष्ट कामगिरीनंतर विश्वचषकात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम आता पूर्णपणे अर्जेंटिनाचा कर्णधार मेस्सीच्या नावावर जमा झाला आहे. ज्याला अनेकजण सर्वकालीन महान खेळाडू मानतात त्या मेस्सीने ऑस्ट्रियाविऊद्धच्या 2-0 अशा विजयात संघाचे दोन्ही गोल केले.

या दोन गोलांमुळे मेस्सीची एकूण गोलसंख्या 18 वर पोहोचली. याआधी स्पर्धेतील आपल्या पहिल्या हॅट्ट्रिकद्वारे त्याने जर्मनीचा आघाडीपटू मिरोस्लाव क्लोस याच्या विश्वचषकातील गोलांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. ऑस्ट्रियाविऊद्धचा मेस्सीचा पहिला गोल 38 व्या मिनिटाला झाला. हा क्षण त्याच्या 39 व्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी आणि घरी आजारी असलेल्या वडिलांच्या प्रकृतीविषयीच्या चिंतेच्या वातावरणात नोंदला गेला. सदर गोल त्याने पेनल्टी कीक हुकल्यानंतर साधारण अर्ध्या तासाने केला.

क्लोस जर्मनीसाठी 24 विश्वचषक सामने खेळले होता. 2014 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा अतिरिक्त वेळेत 1-0 असा पराभव करून त्याने आपली चौथी स्पर्धा गाजवली होती. 12 जून रोजी प्रकाशित झालेल्या एका मुलाखतीत क्लोसने म्हटले होते की, मेस्सी गोल करण्याचा त्याचा विक्रम मोडेल अशी त्याला अपेक्षा आहे.

अर्जेंटिनाने ‘गट जे’मधील पहिले दोन सामने जिंकून बाद फेरीत प्रवेश केला आहे. मेस्सीने कॅन्सस सिटी येथे नेंदल्या गेलेल्या अल्जेरियाविऊद्धच्या 3-0 अशा विजयातही सर्व गोल केले होते. मेस्सीने आपला 18 वा विश्वचषक गोल ‘स्टॉपेज टाइम’च्या अगदी शेवटच्या क्षणात केला. गोलरक्षक अलेक्झांडर श्लागरने त्याचा पहिला प्रयत्न रोखल्यानंतर त्याने अनेक बचावपटूंच्या मधून चेंडू जाळीत फटकावला.

पहिल्या सत्रामध्ये मेस्सीने गोलचा विक्रम आपल्या एकट्याच्या नावावर केला. यावेळी फॅकुन्डो मेदिना याचा पास थियागो अल्माडाने स्वत:हून जाऊ दिला आणि तो थेट मेस्सीच्या डाव्या पायाकडे आला. त्यावेळी गोलरक्षक श्लागर चुकीच्या दिशेला झुकलेला असल्याने मेस्सीने संधी साधली. त्यापूर्वी नवव्या मिनिटाला मेस्सीची पेनल्टी हुकली तेव्हा प्रेक्षक निराश झाले. त्याचा डाव्या पायाने मारलेला फटका उजव्या पोस्टच्या अगदी जवळून बाहेर गेला. सलग तीन स्पर्धांमध्ये त्याच्या पेनल्टी हुकल्या आहेत.

ही पेनल्टी लाउटारो मार्टिनेझ ‘बॉक्स’मध्ये मोकळ्या जागेतून धावत असताना झेव्हर श्लागर आणि स्टीफन पोश यांनी त्याला मागून पाडल्याने मिळाली होती. मार्टिनेझ गोलजवळ जमिनीवर पडलेला असतानाही खेळ एका मिनिटापेक्षा जास्त वेळ सुरू राहिला. जेव्हा त्याच्यासाठी खेळ थांबवण्यात आला तेव्हा पंचांनी त्या प्रसंगाचा आढावा घेतला आणि पेनल्टी दिली.

विश्वचषकातील सलग सहाव्या सामन्यात गोल

विश्वचषकातील सलग सहाव्या सामन्यात गोल करण्याची कामगिरी मेस्सीने केली असून यापूर्वी अशी कामगिरी फ्रान्सचा आघाडीपटू जस्ट फॉन्टेन आणि ब्राझीलचा महान खेळाडू जॅरझिन्हो यांनाच करता आली होती.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​