Uncategorized

अश्मिताची उपांत्य फेरीत धडक,अनमोलचे आव्हान संपुष्टात

मकाऊ शटल बॅटमिंटन ओपन स्पर्धा-2026

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय अश्मिता चालिहाने दुखापतीतून सावरत शानदार कामगिरी सुरु ठेवली आणि कोरियाच्या किम मिन सनचा सरळ गेमस्मध्ये पराभव करुन महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला,मात्र तिची सहकारी अनमोल खर्ब हिला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्याने स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

आसामच्या 26 वर्षीय अश्मिताने जिने दुखापतीमुळे तीन महिने विश्रांती घेतल्यानंतर मे महिन्यात पुनरागमन केले होते,जागतिक क्रमवारीत 99 स्थानावर असलेल्या किमचा 21-16,21-18 असा पराभव करण्यासाठी 37 मिनिटे घेतली.या वर्षीच्या बिडब्लूएफ टूर स्पर्धेतील तिची ही पहिलीच उपांत्य फेरीची कामगिरी आहे.कोर्टवर परतल्यानंतर तिने यापूर्वी चायना मास्टर्स सुपर 100 आणि मलेशिया मास्टर्स सुपर 500 स्पर्धामध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.कोरिया ओपनदरम्यान उजव्या गुडघ्यातील मेडियल मेनिस्कस टियर मुळे शस्त्रक्रिया आणि दीर्घ पुनर्वसन प्रक्रियेतून जावे लागलेल्या अश्मिताचा जागतिक क्रतवारी 63 अंतिम फेरीतील स्थानासाठी कोरियाच्या पार्क गा युनशी सामना होईल.दुसरीकडे जागतिक क्रमवरीत 51 व्या स्थानावर असलेल्या अनमोलला मात्र चांगली सुरुवात करुनही विजयाची संधी साधता आली नाही,60 मिनिटे चालेल्या समान्यात तिला चौथ्या मानंकित आणि जागतिक क्रमवारीत 51 व्या स्थानावर असलेल्या हान कियान शी हिच्याकडून 21-14,15-21,13-21 असा पराभव पत्करावा लागला.पहिल्या गेममध्ये अश्मिता आणि किम यांच्यात चुरशीची लढत झाली,गुणसंख्या 14-14 अशी बरोबरीत असताना भारतीय खेळाडूने सलग चार गुण मिळवून सामन्यावर पकड मिळवली आणि अखेरीस तो गेम जिंकला.दुसऱ्या गेमची सुरुवात अश्मितासाठी चिंताजनक ठरली  कारण किमने 8-2 अशी आघाडी घेतली होती.मात्र भारतीय खेळाडूने हळूहळू सामन्यात पुनरागमन केले आणि गुणसंख्येतील अंतर 16-18 पर्यंत कमी केले, त्यानंतर सलग पाच गुण जिंकून तिने विजय निश्चित केले.

 

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​