Karad News | कराडमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ‘वारणा लॉज’वर पोलिसांचा छापा, दोन महिलांची सुटका!

मलकापूर येथील लॉजमध्ये अनैतिक व्यवसायावर कारवाई
कराड : मलकापूर येथील वारणा हॉ टेल अँड लॉज येथे अनैतिक मानवी वाहतूक व देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर कराड शहर पोलिसांनी गुरुवारी रात्री कारवाई करत दोन महिलांची सुटका केली. या कारवाईत लॉज व्यवस्थापकास ताब्यात घेतले असून संबंधितांविरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
कराड शहरचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा आंबले, सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, उपनिरीक्षक निखील पोलीस मगदूम, नाईक सज्जन जगताप तसेच इतर पोलीस कर्मचारी या पथकात सहभागी होते.पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, वारणा लॉज येथे पैशाच्या मोबदल्यात महिलांनाठेवून अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची शक्यता व्यक्त केली होती.
त्यानुसार पोलिसांनी पंच व एका बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचला. संबंधित व्यक्तीने लॉजमध्ये जाऊन चौकशी केली असता, महिलांसोबत शरीरसंबंधासाठी एक हजार रुपये आणि खोलीसाठी पाचशे रुपये आकारले जात असल्याची माहिती समोर आली. व्यवहार निश्चित झाल्यानंतर पूर्वनियोजित इशारा मिळताच पोलिसांनी तत्काळलॉजवर छापा टाकला.
कारवाईदरम्यान लॉजमधील एका खोलीत दोन महिला आढळून आल्या. पोलिसांनी त्यांची सुटका करून पुढील काळजी व संरक्षणासाठी ताब्यात घेतले. तसेच घटनास्थळावरून रोख रक्कम, लॉज नोंदवही, निरोध पाकिटे व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
पोलिसांनी लॉज व्यवस्थापक हर्षवर्धन कांबळे यास ताब्यात घेतले असून चौकशीत लॉज मालक व इतर संबंधित व्यक्तींची नावे समोर आली आहेत. या प्रकरणी पुढील तपास कराड शहर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
Source link



