हैदराबाद प्लेऑफमध्ये, चेन्नईचे पॅकअप?

चेन्नईवर 5 गड्यांनी विजय : सामनावीर इशान किशनची 70 धावांची खेळी :पॅट कमिन्सनचे 3 बळी
वृत्तसंस्था/ हाँगकाँग
सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करत त्यांना स्पर्धेतून बाहेर केले आहे. चेपॉकच्या मैदानावर झालेल्या सामन्यात हैदराबादने 5 विकेट्सने विजय मिळवला. चेन्नईवरील या विजयासह हैदराबाद व गुजरात टायटन्स संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 7 बाद 180 धावा केल्या. यानंतर हैदराबादने विजयी लक्ष्य 5 गड्यांच्या मोबदल्यात पार करत शानदार विजय मिळवला. इशान किशनची अर्धशतकी खेळी हैदराबादसाठी मॅचविनिंग इनिंग ठरली.
चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 181 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. ट्रॅव्हिस हेड 6 धावांवर बाद झाला. यानंतर अभिषेक व इशानने संघाचा डाव सावरला. अभिषेक 26 धावा करत बाद झाला. तर हेनरिक क्लासेनने 26 चेंडूत 6 चौकार व 2 षटकारांसह 47 धावांची खेळी करत माघारी परतला. यानंतर इशान किशनने 47 चेंडूत 7 चौकार व 3 षटकारांसह 70 धावांची खेळी केली. इशानच्या मॅचविनिंग खेळीसह नितीश रे•ाrने 11 आणि सलिल अरोरा 10 धावांचे योगदान दिले. यासह चेन्नईने 19 षटकांत 5 विकेट्स गमावत 181 धावा करत विजय मिळवला आणि विजयासह प्लेऑफमधील स्थान निश्चित केले.
प्रारंभी, चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संजू सॅमसन 13 चेंडूत 27 धावा करत बाद झाला. ऋतुराजने 21 चेंडूत 15 धावांची संथ खेळी केली, ज्यामुळे संघाच्या धावांवर याचा परिणाम झाला. यानंतर उर्विल पटेल 13 धावा करुन माघारी परतला. यानंतर कार्तिक शर्माने 32 धावांची खेळी केली. याशिवाय, डेवाल्ड ब्रेविस व शिवम दुबे या जोडीने 59 धावांची भागीदारी रचली. डेवाल्ड ब्रेविसने 27 चेंडूत 2 चौकार व 4 षटकारांसह 44 धावांची खेळी केली. तर शिवम दुबेने 26 धावांचे तर प्रशांत वीरने 11 धावांचे योगदान दिले. या जोरावर चेन्नईने 20 षटकांत 7 बाद 180 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्स 20 षटकांत 7 बाद 180 (संजू सॅमसन 27, ऋतुराज गायकवाड 15, उर्विल पटेल 13, कार्तिक शर्मा 32, ब्रेव्हिस 44, शिवम दुबे 26, प्रशांत वीर 11, पॅट कमिन्स 3 बळी, सकिब होसेन 2 बळी)
सनरायजर्स हैदराबाद 20 षटकांत 5 बाद 181 (अभिषेक शर्मा 26, हेड 6, इशान किशन 70, क्लासेन 47, नितीश कुमार रे•ाr 11, सलील अरोरा नाबाद 10, रविचंद्रन एस नाबाद 5, मुकेश चौधरी 2 बळी, नूर अहमद, अकिल होसेन आणि अंशुल कंबोज प्रत्येकी 1 बळी).
चेन्नईचे आव्हान संपल्यात जमा
प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईला दोन सामने जिंकणे आवश्यक होते, पण यातील एक सामना त्यांनी सोमवारी गमावला. आता, त्यांचा शेवटचा सामना 21 रोजी गुजरात विरुद्ध होईल. हा सामना जिंकत त्यांना 14 गुणापर्यंत पोहोचता येईल. दुसरीकडे, आरसीबी संघ प्ले ऑफमधील स्थान निश्चित केले आहे तर हैदराबाद आणि गुजरातने देखील 16 गुणासह प्लेऑफ मध्ये प्रवेश केला आहे. आता, एका जागेसाठी मात्र पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चुरस रंगणार आहे. विशेष म्हणजे, चेन्नईला प्लेऑफ गाठण्यासाठी पंजाब (1 सामना बाकी) आणि राजस्थान (2 सामने शिल्लक) यांच्या पराभवाची प्रतिक्षा करावी लागेल.
Source link



