Uncategorized

Kagal News | कागलमध्ये मगरीची दहशत! पाण्यासाठी गेलेल्या मेंढरांवर झडप घालण्याचा प्रयत्न

                                              कागल तालुक्यात मगरीचे दर्शन

सेनापती कापशी: कागल तालुक्यातीलआलाबाद आणि मासा बेलेवाडी जवळील कोयाची बाव (विहीर) म्हणून परिचित असणाऱ्या ठिकाणी पूर्ण वाढ होत असलेल्या मगरीचे दर्शन झाल्याने दोन्ही गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आलाबाद गावच्या हद्दीतील पठाण यांच्या शेताजवळ रविवारी सायंकाळी बकरी चारणाऱ्या धनगरांची मेंढरं पाण्यासाठी कोयाच्या बावीत गेली असता त्या पाण्यातून मगर पटकन बाहेर आली.

त्यावेळेस मेंढरं चारणाऱ्या धनगराने याची माहिती जवळील शेतकऱ्यांना दिली.चिकोत्रा नदीपासून हे अंतर खूप दूर आहे. शिवाय इथेही पाणी अतिशय कमी आहे. सदरची विहीर ही ओढ्याच्या काठावर असून ती पूर्णपणे मुजत आली आहे. ओढाडी पूर्णपणे कोरडा असून मगर इथवर कशी काय आली, याचेच आश्चर्य वाटत आहे.

मगरीच्या दर्शनाने मात्र या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. मगरीचा संबंधित विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​