Uncategorized
साहिल चव्हाणचे दहावी परिक्षेत उज्ज्वल यश

कणकवली
कणकवली तालुक्यातील आयडियल इंग्लिश स्कूल विद्यानगर, वरवडे या प्रशालेतील कु. साहिल रेवती रविंद्रकुमार चव्हाण याने SSC दहावी इंग्रजी माध्यमातून बोर्ड परीक्षेत 80.80 टक्के गुण प्राप्त करीत यश संपादन केले आहे.कुठल्याही खासगी क्लासेसला न जाता साहिलने हे यश मिळविले आहे. त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या यशामागे त्याच्या प्रशालेतील सर्व शिक्षक, आई, वडील, बहिण आणि आप्तेष्ट याचा मोलाचा वाटा होता. शिवाय कोणत्याही खासगी क्लासेसचा आधार न घेता, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळविले आहे.विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर येथील स. अधीक्षक रविंद्रकुमार चव्हाण याचे ते चिरंजीव होय.
Source link



