Uncategorized

कलंबिस्त – वेर्ले मार्गावरील अपघातात तिघे जखमी

सावंतवाडी : प्रतिनिधी

सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त – वेर्ले मार्गावर टाटा पंच कार आणि मोटरसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास झाला .या अपघातात सुमित तावडे या मोटरसायकलस्वाराला गंभीर दुखापत झाली असून पंचायत समिती कार्यालयातील महिला कर्मचारी दिशा अमित लिंगवत (४०) व त्यांची लहान मुलगी अन्वी लिंगवत (२ ) हिला दुखापत झाली आहे . त्यांच्यावर सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सावंतवाडी कुटीर रुग्णालयातील रक्तपेढीतील कर्मचारी अमित लिंगवत व त्यांची पत्नी दिशा लिंगवत व मुलगी अन्वी लिंगवत ही वेर्ले येथून माडखोलात लग्नासाठी येत होते यावेळी समोरून येणारी मोटरसायकल अचानक मारुती कारच्या समोरील दर्शनी भागाला येऊन आदळली त्यात हा अपघात झाला. यात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे .


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​