Uncategorized

Kagal News: रस्त्याच्या वादावरुन आंदोलनकर्ते भडकले, तहसिलदारांसमोरच घोषणाबाजी

रस्त्याच्या मागणीची पूर्तता न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा

मुरगूड : येथील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरावेळी चिमगावच्या भारमलनगर रस्त्याच्या वादातील आंदोलनकर्त्यांनी कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांचे भाषण सुरू असताना प्रचंड घोषणाबाजी करत न्यायाचा आग्रह धरला.

तहसीलदार वाकडे यांचे भाषण सुरू असतानाच आंदोलकांनी सभागृहात प्रवेश करत जोरदार घोषणाबाजी केल्याने सभागृहात काही काळ गोंधळ माजला. रस्त्याच्या मागणीची पूर्तता न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशाराही दिला. तहसीलदार वाकडे यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत शांततेत तोडगा काढण्याचे आवाहन केले. 15 मिनिटांहून अधिक काळ हा वाद सुरू होता.

त्यानंतर आंदोलकांनी सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती चिघळू नये म्हणून मुरगूड पोलीस स्टेशनच्या एपीआय क्रांती पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर आंदोलकांनी तहसीलदारांना निवेदन देत आपल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी केली.

दरम्यान, चिमगाव येथील गट क्रमांक 330, 329 आणि 341 मधील रस्त्याच्या विस्ताराच्या मागणीवरून दोन गट आमनेसामने आले आहेत. काही शेतकऱ्यांनी रस्त्याच्या विस्तारासाठी उपोषण सुरू केले असून दुसऱ्या बाजूला संबंधित रस्ता 2020 च्या तहसीलदार आदेशानुसार आधीपासूनच मोकळा व डांबरी असल्याचा दावा करत अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी प्रति उपोषण सुरू केले आहे.

दुसऱ्या बाजूच्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीच रस्त्यासाठी 10 गुंठे जमीन देण्यात आली असून नव्या रस्त्याच्या मागणीमुळे आणखी 4 गुंठे जमीन बाधित होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने न्याय्य निर्णय घ्यावा, अशी मागणी दोन्ही गटांकडून करण्यात येत आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​