Uncategorized

Kolhapur news | गोकूळमध्ये आज ‘चहापानाची’ खलबतं! प्रशासक येणार की सुप्रीम कोर्टात धाव घेणार?

                                   गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार

कोल्हापूर – गोकूळ दूध संघातील विद्यमान सभागृहाचा कार्यकाल आज सोमवारी संपत आहे. उद्या मंगळवारपासून प्रशासक येणार असल्याने आजचा दिवस सर्वासाठीचा धाकधुकीचा असणार आहे. आजच सत्ताधाऱ्यांनी चहापानाची बैठक बोलावली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या जाणाऱ्या याचिकेबद्दल चर्चा होणार आहे.

तब्बल ६३ वर्षाच्या दैदीप्यमान यशाची गाथा सांगणाऱ्या गोकुळ दूध संघावर प्रशासक येण्याची नामुष्की ओढवली आहे. निवडणूक प्रक्रिया लांबल्याने केवळ औपचारीकता म्हणूनजरी प्रशासक येत असलेतरी हे करताना झालेली चिखलफेक आणि कुरघोड्या यामुळे संस्थेच्या विश्वासार्हतेला धक्का बसू लागला आहे.सर्कीट बेंचच्या निर्णयानुसार निवडणूक पुढे जाऊन प्रशासक आणण्याच्या प्रक्रीयेला आक्षेप घेत सत्ताधारी संचालकांनी सर्वोच्च न्यायालयात अपिल करण्याची तयारी केली आहे. हे करावे की नको याबाबतही संचालकांमध्ये दोन मतप्रवाह आहेत.

या अनुषंगाने चर्चा करून निर्णय घेण्यासाठी अध्यक्षांनी आज गोकुळमध्ये संचालकांना चहापानाच्या बैठकीचे निमंत्रण धाडले आहे. दरम्यान आमदार शिवाजी पाटील यांनी केलेल्या आरोपांच्या संदर्भात मंत्री हसन
मुश्रीफ यांनी थेट मुख्यमंत्र्यासमोरच सोक्षमोक्ष लावण्याची घोषणा केली आहे. आज अपात्र कर्जमाफीसंदर्भात नाबार्ड अध्यक्षांसमवेत बैठक संपल्याने मुश्रीफ मुख्यमंत्र्यांची भेट घेउन आमदार पाटील यांच्याविषयी तक्रारींचे गाऱ्हाणे मांडणार आहेत.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​