Uncategorized

व्यावसायिक सिलिंडरपाठोपाठ पीएनजीही महागला

54 रुपयांची वाढ : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

बेळगाव : मध्य-पूर्वेतील युद्धाची धग अद्यापही कायम असल्याने महागाईची झळ सर्वसामान्यांना बसत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 993 रुपयांनी वाढ झाली असतानाच मेगा गॅस कंपनीकडूनही रविवार दि. 3 मे रोजीपासून 54 रुपयांनी दर वाढविण्यात आला आहे. त्यातच घरगुती गॅस सिलिंडरही 500 रुपयांनी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकंदरीत एलपीजी आणि पीएनजी गॅसच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चालली असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. गेल्या दीड महिन्यापासून मध्य-पूर्वेतील युद्धाची धग कायम असल्याने विशेष करून इंधनाच्या दरात वाढ होत चालली आहे. एलपीजी

गॅसचा पुरवठा कमी होत असल्याने व्यावसायिक सिलिंडर वेळेत मिळणे कठीण झाले आहे. त्यातच काळाबाजारही वाढला असल्याने हॉटेल व्यावसायिकांना अतिरिक्त पैसे मोजून गॅस मिळविण्याची वेळ आली आहे. त्यातच व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 993 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. अलीकडेच हॉटेल ओनर्स असोसिएशनची बैठक पार पडली असून त्यामध्ये हॉटेल पदार्थांच्या दरात वाढ करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

दर महिन्यातून एक घरगुती सिलिंडर सध्या दिले जात आहे. लग्न, यात्रा यामुळे सिलिंडरच्या मागणीत मोठी वाढ झाली असली तरीही सिलिंडर मिळणे कठीण बनले आहे. अनेकजण चुलीवर स्वयंपाक करताना दिसत आहेत. बेळगाव शहरात काही ठिकाणी मेगा गॅस कंपनीकडून घरोघरी गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. दर दोन महिन्यांतून एकदा कंपनीकडून बिल दिले जाते. मात्र, पीएनजी गॅसच्या दरातही रविवार दि. 3 मे पासून 54 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हा नवीन दर रविवारपासून लागू करण्यात आला असल्याचे कंपनीकडून ग्राहकांना कळविण्यात आले आहे.

ग्राहकांमध्ये संभ्रम

काही ठिकाणी चालू महिन्यातच कंपनीकडून वाढीव बिल देण्यात आल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. घरगुती गॅस सिलिंडरही 500 रुपयांनी महागणार असल्याचे बोलले जात आहे. सातत्याने गॅस व इंधनाच्या दरामध्ये  वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​