Uncategorized

प.पू. सद्गुरू आबा महाराज यांचा २८ वा पुण्यतिथी सोहळा उद्या

त.भा. वृत्तसेवा
बांदा

इन्सुली-बिलेवाडी येथील प.पू. सद्गुरू आबा महाराज यांचा २८ वा पुण्यतिथी सोहळा शनिवार, दि. ११ रोजी उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा होणार आहे. या निमित्त दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्याची सुरुवात सकाळी १०:०० वाजता ‘पादुका पूजन’ आणि ‘अभिषेक’ विधीने होईल. त्यानंतर सकाळी ११:०० वाजता ‘सत्यनारायण महापूजा’ व ‘आरती’ संपन्न होईल. दुपारी १:०० वाजता उपस्थित भाविकांसाठी ‘महाप्रसादा’चे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ८:०० वाजता स्थानिक भजनांचा कार्यक्रम रंगणार आहे. सोहळ्याची सांगता रात्री ९:०० वाजता ‘आरोलकर दशावतार नाट्य मंडळ (आरवली)’ यांचा ‘पुष्कर्णी तीर्थ’ हा नाट्यप्रयोग येथे होणार आहे. तरी या सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन सद्गुरू कला, नाट्य भजन मंडळ, बिलेवाडी आणि ग्रामस्थ वतीने करण्यात आले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​